वाळू माफियाने थेट तहसीलदारावर ट्र्रॅक्टर चालवला;मराठवाड्यातील घटना
Sand mafia drove a tractor directly at the Tehsildar; incident in Marathwada

गुन्हा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर गुन्हेगारांनी हल्ला चढवला. हा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडला आहे.
कारवाईसाठी गेलेले अंबड तालुक्याचे तहसीदार विजय चव्हाण यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्र्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. जालना जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांची सध्या चांगलीच दहशत माजली आहे.
गुटखा, मटका, वाकूमाफिया,लूटमार, खून अशा घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र प्रशासन डोळे बंद करून हे सगळे पाहत आहे.यामागे नेमके कारण काय हे मात्र सर्वमान्य जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.
अंबड तालुक्याचे तहसीदार विजय चव्हाण यांनी वाळू माफियांना पकडण्यासाठी स्वतः मोहिम हाती घेतली होती. ज्या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक होत होती त्या ठिकाणी तहसीदार विजय चव्हाण गेले
मात्र वाळू माफियांनी त्यांना पहाताच पळ काढला. विजय चव्हाण यांचे पथक वाळू माफियांना रोखण्यासाठी नदी पात्रात उतरले. काही वाळू माफिया पळून गेले जवळ पास १५ व्यक्ती त्या ठिकाणी हजर होते.
तहसीलदार चव्हाणांनी शहागड येथील पुलावरून पाहिले असता त्या ठिकाणी जवळपास पंधरा व्यक्ती तीन ट्रॅक्टर मध्ये बाळू भरत असताना दिसले.
तहसीलदारांची गाडी आल्याचे वाळू माफियांच्या लक्षात येताच तिथून त्यांनी धूम ठोकली. ट्रॅक्टरवरील चालकास ताब्यात घेत असताना ट्रॅक्टर चालकाने कर्मचाऱ्यांना ढकलून पळ काढला.
त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका व्यक्तीने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळूमाफियाने तहसीलदारांना “आज तुला बघतो” अशी धमकी देत त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
तहसीलदार विजय चव्हाण यांनी त्यांच्या जवळ खाजगी बंदुकीतून हवेत चार राऊंड फायर केले. त्यामुळे ट्रॅक्टर चालक इशान इम्रान खान, तीन अनोळखी व्यक्ती एक ट्रॅक्टर घेऊन पळाले. व महसूल पथकाने दोन ट्रॅक्टर जागीच पकडले.
ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण 11 लाख 10 हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादी वरून इशान इमरान खान (गेवराई, जिल्हा बीड) याच्यासह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.