विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्णा शहरात पोलीस पथसंचलन
In the wake of the assembly elections, police patrolling in Purna city

पुर्णा-शेख तौफिक /9970443024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 पार्श्वभूमीवर पुर्णा शहरात शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले ,
पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सशस्त्र अतिरिक्त सीमा बल लखनौ येथील जवान सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गाने हे पथसंचलन करण्यात आले.
यावेळी पोलीस ठाणे पूर्णा शहरात आणि ग्रामीण भागामधील एरंडेश्वर आणि सुहागन येथे विधानसभा निवडणूक अनुषंगाने स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी
आणि बीएसएफ अधिकारी आणि जवानांचे शहरात व ग्रामीण भागात मतदान शांततेत आणि भयमुक्त पणे करण्यासाठी पथसंचलन घेण्यात आलेले आहे.
पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिसन नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत केंद्रे,
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार आणि बीएसएफ तुकडी अधिकारी व कर्मचारी हजर होते.निवडणुकीच्या कालावधीत
आचारसंहितेचे पालन करून शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विशेष बंदोबस्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विलास घोबाडे यांनी सांगीतले .









