विधान परिषदेसाठो काँग्रेस पक्षाकडून नदीम इनामदार यांना उमेदवारी ?

Nomination of Nadeem Inamdar from Congress Party for Vidhan Parishad?

 

 

 

 

 

 

 

 

 

विधान परिषदेच्या एकूण 11 जागेसाठी होणाऱ्या निवडणुकी करिता परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार यांची उमेदवारी

 

 

 

 

अंतिम टप्प्यात असून लवकर त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

 

 

याबाबत माहिती अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने एकही उमेदवार मुस्लिम समाजातून दिला नाही,असे असतानासुद्धा मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली,

 

 

 

 

भविष्यात मुस्लिम समाजामध्ये नाराजीची भावना निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम समाजाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून या विधानपरिषद निवडणूकित

 

 

 

काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले आहे.गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत पक्षाच्या वतीने उमेद्वाराबाबत मंथन सुरु आहे,

 

 

संभावित उमेदवारांच्या चाचपणीत परभणी शहर जिल्हाकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार यांचे नाव पक्षातर्फे अंतिम यादीत समावेशित करण्यात आले असून

 

 

 

आज किंवा उद्या त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

 

 

 

नदीम इनामदार हे अतिशय सामान्य कुटुंबातून असून त्यांच्या कामाची दाखल पक्षातर्फे घेण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षापासून

 

 

ते परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडून पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेले आहे

 

 

 

.नदीम इनामदार यांच्या शहर अध्यक्षपदाच्या कार्यकाळात २०१२ आणि २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले आणि महानगपालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली

 

 

 

एक अल्पसंख्यांक नेता म्हणून त्यांची मराठवाड्यात ओळख आहे, पक्षाचे निष्ठावान ,संयमी ,मृदभाषी आणि पक्षाकरिता सदैव दिवस रात्र मेहनत करण्याची तयारी ही त्यांची जमेची बाजू आहे,

 

 

 

 

परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाढ होण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात त्याचीच दाखल घेत पक्षाकडून त्यांच्या नावावर अंतिम शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

काँग्रेस पक्षाला विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांपैकी पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून १ जागा वाट्याला येणार आहे.मल्लिकार्जुन खडगे आणि राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून

 

 

 

पक्षातील प्रस्थापितांना बाजूला करून नव्या आणि पक्षासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रवाह पक्षात असल्यामुळे नदीम इनामदार यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

 

 

 

याबाबत नदीम इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता आपण पक्षाचे सैनिक असून पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पडण्यास आपण सक्षम असल्याचे त्यांनी दैनिक खरा दर्पण शी बोलताना सांगितले.

 

 

 

 

विधान परिषदेचे निवृत्त होणारे सदस्य आणि निवडणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे

 

निवडणूक

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *