विमान अपघात; दाव्याच्या रकमेने इंश्योरन्स कंपन्यांच्या तोंडाला फेस

Plane crash; Insurance companies face huge loss due to claim amount

 

 

 

 

भारतात एअर इंडियाच्या भीषण अपघाताने विमा कंपन्यांच्या जगताला वेगळे वळण लागण्याची चिन्हं आहेत. अहमदाबाद एअरपोर्टवर झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या विमान अपघातात २४१ प्रवासी तर अन्य मिळून २६० हून अधिक लोग दगावले आहेत.

 

हे सुद्धा वाचा !Maharashtra Breaking News;मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळच ड्रोन पडल्याने एकच खळबळ ;नेमकं काय घडलं?

 

आता विमान प्रवाशांचा विमा दावा इतका मोठा आहे की त्याने ग्लोबल एव्हीएशन इंडस्ट्रीचे गणितच बदलले आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार या विमान दुर्घटनेतील विमा दावा सुमारे $475 दशलक्ष डॉलरपर्यंत (₹3940 कोटी रुपये) पोहचू शकतो. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एव्हीएशन इंश्योरेन्स क्लेम म्हटला जात आहे.

 

हे सुद्धा वाचा !पाहा दोन दिवस कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस

एकट्या विमानाची बॉडी आणि इंजिनचे नुकसान 125 दशलक्ष डॉलरचे आहे. तर प्रवाशांची जिवितहानी आणि अन्य नुकसान याची जबाबदारीचा संबंधीचा दावा अंदाजित 350 दशलक्ष डॉलर इतका आहे.

 

 

भारतातील एव्हीएशन इंडस्ट्रीत साल 2023 रोजी जेवढा एकूण विमा प्रिमीयम जमा झाला होता.त्याहून ही रक्कम तीन पट जादा आहे. म्हणजे हा अपघात एअरलाईन्सच नाही तर संपूर्ण विमा सेक्टरची डोकेदुखी बनला आहे.

हे सुद्धा वाचा !BREAKING NEWS;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीला

डोमेस्टीक विमा कंपन्यांनी त्यांचे 95% हून अधिक एव्हीएशन रिस्क आंतरराष्ट्रीय रीइंश्योरन्स कंपन्यांना ट्रान्सफर करुन ठेवले आहेत. याचा अर्थ खरी भरपाई तर विदेशी कंपन्यांना करावी लागणार आहे.

 

हे सुद्धा वाचा !Maharashtra political breaking news;दोन्ही ठाकरे एकत्र झाल्यास महायुतीची दाणादाण ;सर्व्हेने महायुतीत खळबळ

आणि त्याच कंपन्या आता प्रीमीयमच्या अटी कठोर करायला जात आहेत असे जनरल इंश्योरेन्स कॉर्पोरेशनचे (GIC Re) चेअरमन रामास्वामी नारायणन यांनी म्हटले आहे.

 

 

या अपघातात अनेक परदेशी नागरिक देखील होते. त्यांच्या वारसांना त्यांच्या देशातील कायद्यांतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे.त्यामुळे एकूण दाव्याची रक्कम वाढणार आहे.

 

हे सुद्धा वाचा !देशातील SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का;एक निर्णयाचा कोट्यवधी लोकांना फटका

या अपघाताने भारतातील एव्हीएशन विमा पॉलीसीच्या प्रीमीयममध्ये मोठी वाढ होऊ शकते. खासकरुन पॉलीसी रिन्हूय होताना तर एअरलाईन्स कंपन्यांना मोठी तगडी रक्कम मोजावी लागणार आहे असे विमा क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

 

 

विमान आणि इंजिन भारतात बनवलेले होते., परंतू एअर इंडिया बोईंग ड्रीमलायनर विमान अपघात विम्याचे ओझे मात्र परदेशी कंपन्यांच्या डोक्यावर पडणार आहे.

हे सुद्धा वाचा !नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष; पालकांना लाखोंचा गंडा

 

यामुळे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील एव्हीएशन इंश्योरन्स सेक्टरवर परिणाम होणार असून प्रवास आणखी महाग होण्याची चिन्हं आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *