विमान क्रॅश झाल्याने स्फोट, ६७ जणांचा मृत्यू;;पहा LIVE VIDEO

Plane crashes, explosion kills 67; watch LIVE VIDEO

 

 

 

 

दक्षिण कोरियात रविवारी एक विमान क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. विमान लँडिंग करताना क्रॅश झाल्याने विमानाचा मोठा अपघात झाला.

 

या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे.

 

हे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवर अचानक घसरल्याचं दिसत असून त्यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

 

समोर आलेल्या वृत्तानुसार, या विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यापैकी १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते.

 

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला आहे. विमानतळाच्या सीमेवरील भिंतीला आदळल्यानंतर विमानाचा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली.

 

या घटनेमुळे मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. विमानाला आग लागल्यानंतर धुराचे मोठे लोट पसरले होते.

 

विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.

 

मात्र, आगीचे नेमके कारण तपासण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

दरम्यान, या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

तसेच यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच

 

मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य करण्याचे आदेश दिले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *