शरद पवार गटाच्या आमदाराकडून अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात

Advertisement for Ajit's 'clock' by Sharad Pawar faction MLA

bj admission
bj admission

 

 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार राजू खरे हे पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत.

शरद पवार गटाच्या आमदाराकडून अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात

 

त्यांनी नुकतीच स्थानिक दैनिकांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘तुतारी’ ऐवजी अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

राजू खरे यांनी या जाहिरातीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले,म्हणाल्या अजूनही उशीर झालेला नाही’

 

यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते.

 

 

यानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली होती. तर त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचे फोटो झळकले होते.

महविकास आघाडी फुटणार ?संजय राऊत म्हणतात ;राज्यात दोनच समविचारी पक्ष

 

यानंतर आता पुन्हा एकदा राजू खरे यांच्याकडून स्थानिक दैनिकांना दिलेल्या जाहिरातीत पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस ऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात आला आहे.

 

 

राजू खरे यांच्या पक्षविरोधी कृतींमुळे आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात शिस्त भंगाची कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अनुदानात 100 कोटींचा घोटाळा,21अधिकाऱ्यांचे निलंबन

दरम्यान, 10 जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते खासदार नीलेश लंके यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून व्यासपीठ गाजवले.

 

दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला रंगेहात अटक

राज्यभरातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यात जमले होते. मात्र, वर्धापन दिन कार्यक्रमाला आमदार राजू खरे गैरहजर राहिले होते,

 

 

ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर याआधी काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खरे यांनी, “माझ्या हातात चुकून तुतारी आली,” असे वक्तव्य करूनही खळबळ उडवून दिली होती.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *