सलमान च्या लग्नासाठी त्याच्या आईची होती “ही” अभिनेत्री पसंत

It was Salman's mother's choice of "this" actress for his wedding

 

 

 

 

 

बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर अभिनेता सलमान खान 59 वर्षांचा झाला आहे. वयाच्या या टप्प्यावरही सलमान खान एकटाच आहे. सलमान खानच्या आयुष्यात अनेक मुली आल्या

 

 

 

पण त्याने कधीही कोणाशी लग्न केले नाही. सलमानने स्वत: कबूल केले होते की त्याला अनेक गर्लफ्रेंड आहेत पण लग्नाचे कोणाशीही जमले नाही.

 

 

 

सलमान खानच्या गर्लफ्रेंडमध्ये ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, संगीता बिजलानी यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे पण या सर्वांचे लग्न इतर ठिकाणी झाले. सलमानने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितले होते की, त्याच्या आईला एकेकाळी टीव्ही अभिनेत्री खूप आवडली होती.

 

 

 

सलमान खानच्या आईचे नाव सलमा खान आहे, ज्यांना प्रसिद्धीझोतात येणे फारसे आवडत नाही. सलमान खान त्याच्या आईच्या खूप जवळ आहे आणि तिचे म्हणणे ऐकतो.

 

 

 

 

सनाया इराणी बिग बॉसच्या ७व्या सीझनमध्ये आली होती आणि जेव्हा ग्रँड प्रीमियर झाला तेव्हा अभिनेत्री सनाया इराणीही स्पर्धक म्हणून आली होती. त्यादरम्यान सलमानने सनायाला विचारले की तू काही लोकप्रिय शो केले आहेस का?

 

 

 

 

यावर सनायाने ‘हो’ असे उत्तर दिले. यानंतर सलमान खान म्हणाला होता, ‘माझी आई तुझी खूप मोठी फॅन आहे. ती तुला आवडते आणि ती गमतीने म्हणाली होती की

 

 

 

 

जर मला जमले तर मी तिला माझी सून बनवीन..” सलमानच्या या विधानावर सनायाला लाज वाटली आणि ती हसायला लागली. मात्र, या सर्व गोष्टी चेष्टेने घडल्या.

 

 

 

४० वर्षीय सनाया इराणी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. सनायाला तुम्ही ‘मिले जब हम तुम’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘रंगरसिया’, ‘भूत’ सारख्या टीव्ही शोमध्ये पाहिले आहे.

 

 

 

सनाया ‘झलक दिखला जा’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे. सनायाने 2006 मध्ये आलेल्या फना या चित्रपटातही काम केले आहे. २०१६ मध्ये सनायाने तिचा को-स्टार मोहित सहगलसोबत लग्न केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *