सहा वर्षांच्या मुलीला गळफास देऊन पोलिस शिपायाने स्वतः केली आत्महत्या

Police constable commits suicide by hanging six-year-old girl

bj admission
bj admission

 

 

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतरल त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली.

 

 

घटस्फोटानंतर मानसिक तणावानंतर त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. स्वप्नील गायकवाड असं त्या पोलिस शिपायाचं नाव असून भैरवी असं सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे.

अमेरिकेत एअर स्ट्राईकची सीक्रेट रिपोर्ट लीक; ट्रम्प तोंडावर पडले

 

 

नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे.

 

 

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीची गळफास देऊन हत्या केली. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

सितारे जमीन पर चित्रपटातून बौद्धिक अक्षम विद्यार्थांना प्रोत्साहित केले

या घटनेप्रकरणी नासिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नील गायकवाडच्या घटस्फोटीत पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

 

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणा रोहतक येथील एका विवाहीत व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिंदीवरून महायुतीचे सरकार अडचणीत ; संजय राऊत भडकले; शिंदेंना ओपन चॅलेंज

 

या तरुणाच्या पत्नीचं पोलीस कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. दोघांनी अश्लील कृत्ये आणि डान्स करतानाचा व्हिडीओ तयार केला होता.

 

 

त्यानंतर हा व्हिडिओ पत्नीने तिच्या मृत विवाहित व्यक्तीला पाठवला होता. त्यानंतर, नैराश्यामुळे पतीने 3 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापला;सरकार अडचणीत,कवींकडून पुरस्कार वापसी

 

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने आरोप केला होता की, त्याची पत्नी दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात आहे,

 

 

हे दोघे मिळून त्याला मानसिक त्रास देत होते. पत्नी दिव्या त्याला त्याच्या वडिलांना मारण्यास आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यास सांगत होती.

 

राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप

पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची आवश्यकता होती, त्यासाठी ती पतीला ब्लॅकमेल करत होती. व्हिडिओमध्ये या तरुणाने पोलिसांकडे मागणी केली होती की,

 

पत्रकारांच्या “त्या” प्रश्नावर अजितदादांचा काढता पाय

 

त्याची पत्नी आणि बॉयफ्रेंडवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून गायब झाला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *