सुधारित शेती अवजारे प्रशिक्षण व हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

Training and transfer program on improved farm implements completed

 

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशु शक्तीचा योग्य वापर विभागाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण

 

 

 

व मूल्यवर्धन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम व सुधारित शेती अवजाराचे हस्तांतरण कार्यक्रम दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे होते.

 

 

 

आणि प्रमुख अतिथी म्हणून संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, हे होते. कार्यक्रमासाठी विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर,

 

 

 

डॉ. राहुल रामटेके, डॉ. चंद्रकांत लटपटे यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, योजनेद्वारे हस्तांतरीत सुधारित शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी

 

 

 

 

 

आपल्या शेतावर प्रत्यक्ष वापर करून कृषि निविष्ठांचा वापर आणि वेळेमध्ये बचत करावी. ही अवजारे शेतकऱ्यांचे श्रम कमी करून शेती उत्पादनवाढीस फायदेशीर ठरतील,

 

 

 

तसेच आपल्या गावातील सोबतच इतर शेतकऱ्यांना या अवजारे व सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ द्यावा. पिकाचे उत्पादन वाढीसाठी आवश्यक अवजारांबाबत संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना आपल्या प्रतिक्रिया देवून प्रोत्साहित करावे.

 

 

 

 

विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्य करते आणि भविष्यातही आपल्या पाठीशी राहील असे नमूद केले.
प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजिका तथा संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी

 

 

 

उपस्थित शेतकऱ्यांना सुधारित अवजारे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अन्नदाता पुरुष बचत गट, प्रकाशवाट शेतकरी उत्पादक कंपनी, आजेगाव, यशोधरा बचत गट,

 

 

 

 

शिंदेफळ, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, भिमक्रांती महिला बचत गट, पळशी तसेच वाघजडी ता. शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ६० महिला व पुरुष शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 

 

 

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. स्मिता सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तुकाराम भुतकार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय देशमुख इंजि. अजय वाघमारे श्री. दिपक यंदे व यांनी पुढाकार घेतला.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *