मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
Minister Bhujbal's envy of the government

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन आता राज्यातील राजकारण तापलं आहे. अध्यक्षांसह तीन ते चार सदस्यांनी देखील राजीनामा दिल्यामुळं
त्यांच्यावर सरकारचा दबाव असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
भुजबळ म्हणाले, कुठूनतरी दबाव आल्याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामा देणार नाहीत. कदाचित मराठा आयोग आणण्याच्या हालचाली सुरु असतील.
या आयोगात असलेल्या लोकांना त्यांची अडचण असेल त्यांचे मतभेद असतील म्हणून त्यांनी राजीनामा दिला असेल. मला सुद्धा हा प्रकार मोठा गुढ वाटतोय. कारण आगोदर अॅड. किल्लारीकर, त्यानंतर हाके, मेश्राम, निरगुडकर, तरवाडकर यांनी राजीनामे दिले आहेत.
हल्लीच्या काही गडबडींमध्ये ही काही तीन-चार लोकं आहेत त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळं आता संपूर्ण आयोगाचाच राजीनामा झालेला आहे.
याच्यामागे काहीतरी कारण आहे. ही सर्व मंडळी स्पष्टपणे बोलत नाहीत कचरताहेत की कशामुळं त्यांच्यावर दबाव आला. म्हणतात दोन मंत्र्यांचा दबाव आला.
सरकारचा दबाव आला पण म्हणजे नेमका काय दबाव आला? कशासाठी दबाव आला? हे त्यांनी सांगितलं पाहिजे. पण हे निश्चित आहे की कुठुनतरी दबाव आल्याशिवाय हे लोक राजीनामा देणार नाहीत. अध्यक्ष हे हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत.
कदाचित आता मराठा आयोगाबद्दल काही निर्णय घ्यायचे असतील आणि त्यांना निरगुडेंचं आयोगात असणं मान्य नसेल म्हणून काही नवे लोक भरायचे असतील.
काय आहे ते आता लोकांच्यासमोर येईलच. मला सुद्धा या सदस्यांनी सांगितलेलं नाही, मी त्यांना सांगितलं राजीनामा देऊ नका. पण नेमकं काय झालंय ते मलाही ते सांगत नाही.