BREAKING NEWS;लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक, दोन इसम सभागृहात घुसले

BREAKING NEWS; Big lapse in security in Lok Sabha, two ISMs entered the hall

 

 

 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला.

 

 

तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. या तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

 

सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते.

 

 

यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या तिघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या तिघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

 

 

 

हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली.

 

 

सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले.

 

 

दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं.

 

 

त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

 

दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं.या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली.

 

 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचं कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते.

 

 

त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली जिथे सर्व खासदार बसून कामकाज करत असतात, तिथे उडी मारली. त्यांच्याकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती.

 

 

दरम्यान, ज्या व्यक्तींनी गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले.

 

 

खासदार दानिश अली म्हणाले, “तानाशाही नहीं चलेगी” (हुकूमशाही चालणार नाही) अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.

 

 

हे दोन जण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला. या दोघांना पकडल्यानंतर खासदारांनी दोघांनाही चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे.

 

 

म्हैसूरचे खासदार प्रतापराव सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

 

 

२००१ साली आजच्याच दिवशी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे अनेक खासदारांनी आजच्या घटनेलाही संसदेवरचा हल्ला म्हटलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *