नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा 18 डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

Municipal Council, Nagar Panchayat employees warning of indefinite work stoppage movement from December 18 ​

 

 

 

 

नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 18 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्याकडून काम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगरपंचायत ,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 मार्च 2023 रोजी विधान भवन मुंबई येथे भेट घेतली .

 

 

या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी सकारात्मक निर्णय घेतले होते परंतु अद्याय पर्यंत घेतलेल्या निर्णयावर कोणतीहि अंमलबजावणी झालेली नाही ,त्यामुळे या प्रलंबित मागण्यावर चर्चा करण्याकरता,

 

 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 31 जुलै 2023 रोजी विधान भवनवर महाराष्ट्रातील हजारो कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी भव्य मोर्चा काढला होता.

 

 

गेल्या अनेक वर्ष सातत्याने विविध आंदोलन करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे कर्मचारी आता जेरीस आलेले आहेत .

 

 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे;नगरपरिषद नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना कोषागार मार्फत मासिक वेतन जिल्हा परिषदेप्रमाणे मिळण्यात यावे .

 

 

नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांना 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी . नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने बक्षी समितीच्या शिफारशीनुसार खंड दोन प्रमाणे वेतन कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे.

 

 

नगरपरिषद ,नगरपंचायत मधील संवर्ग यांना राजपत्रित अधिकारी पद देण्यात यावे , नगरपरिषद ,नगरपंचायत मधील वरिष्ठ लिपिक लिपिक यांना सरळ संवर्ग मध्ये समावेश करण्यात यावे.

 

 

नगरपरिषद, नगरपंचायत अस्थापना वरील कर्मचाऱ्यांना आकृतीबंध तयार करून अनुकंपा भरती करण्यात यावी, 2021 मध्ये 140 कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक क पदी समावेश करण्यात आले

 

 

अशा स्वच्छता निरीक्षक कर्मचाऱ्यांना अ ,ब पदी पदोन्नती देण्यात यावी व जॉब चार्ट तयार करण्यात यावे, राज्यातील नगर परिषद ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायतीमधील पूर्वी प्रमाणे सर्व जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांना विनाअट लाड, पागे समितीरिता कोर्टात शासन मार्फत शिफारस करण्यात याव्यात ,

 

 

नगरपरिषद ,नगरपंचायतमधील पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत कर्मचारी यांना १९९३ ते २००० चे रोजनदारी कर्मचाऱ्यांना मागील सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन करता सेवा ग्राह्य धरण्यात यावी.

 

 

नगरपरिषद , नगरपंचायत मधील कर्मचारी ,कामगार यांना श्रमसाफल्य योजनेच्या माध्यमातून गेल्या अनेक पासून प्रलंबित घरकुल व घरे बांधून देण्याकरता विभागीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर समिती गठीत करून गतिमान कार्यवाही करावी

 

व सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्यात यावी, नगरपरिषद . नगरपंचायत मधील संवर्ग कर्मचारी लिखित शिपाई ,सफाई कामगार यांना १०/२०/३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ व पदोन्नती देण्यात यावी,

 

 

30 जूनला सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना एक जुलै च्या इन्क्रिमेंट देण्यात यावा ते परिपत्रक काढण्यात यावे ,नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचारी तीन आणि वर्ग चार मधील सहभागी कर्मचाऱ्यांना पदोन्नती संधी मिळावी ,

 

 

 

नगरपरिषद नगरपंचायत मधील मधील लेखा अधिकारी, लेखापरीक्षक यांना पदोन्नती देण्यात यावी, नगरपरिषद नगरपंचायत मधील संवर्ग कर्मचाऱ्यांमधून मुख्याधिकारी करिता परीक्षा लवकरात लवकर घेनयेत यावी ,

 

 

 

 

नगरपरिषद नगरपंचायत मधील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे रजा रोधीकरण व अंशदान पैसे भरणा करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्यामार्फत आदेश देण्यात यावे,

 

 

 

नगरपरिषद नगरपंचायत मधील इंजिनिअर यांना ५४०० वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, आदि मागण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यावा ,

 

 

नसता १८ डिसेंबर पासून बेमुदत काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेद निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *