शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीचे माजी आमदार कमळ हाती घेणार

Shock to Sharad Pawar; Former NCP MLA Kamal will take over

 

 

 

 

कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी घडामोडी घडणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर असलेले माजी आमदार सुरेश लाड यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

 

 

नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यानच हा प्रवेश होणार आहे. याच प्रवेशासाठी गेले दोन दिवस माजी आमदार सुरेश लाड हे नागपूर येथे दाखल झाले आहेत.

 

 

त्यामुळे आता यावेळी निश्चित झालेला भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त चुकणार नसल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांचा अंदाज आहे. मागे दोन ते तीन वेळा रखडलेला प्रवेश आता नागपूर येथे होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 

शॉपिंग- मेगा इलेक्ट्रॉनिक डे सेल 9-17 डिसेंबर-लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन आणि बरेच काही , मिळवा 75% पर्यंत सूट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं वृत्त आहे.

 

 

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे एकेकाळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते.

 

 

मात्र अलीकडे त्यांच्यातील हा स्नेह कमी झाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.

 

 

मात्र काही महिन्यांपूर्वी पूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुरेश लाड हे तटकरे यांच्या बरोबर न राहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर राहिले आहेत.

 

 

मात्र आता त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जत येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाने काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केल आहे.

 

अजित पवार राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होण्याअगोदरच भाजपाने तटकरे यांच्या निकटवर्तीयांना भाजपमध्ये प्रवेश देऊन तटकरे यांना शह देण्यास सुरुवात केली होती.

 

 

 

तटकरे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या कन्या असलेल्या पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेच्या यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेकापचे नेते धैर्यशील पाटील यांनाही यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

 

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरेश लाड यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

त्यामुळे आता भाजपने शरद पवार गटाला धक्का देण्याची रणनीती आखतानाच रत्नागिरी रायगड लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाही हा सूचक इशारा मानला जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *