विनोद तावडेंचे घुमजाव ;आधी म्हणाले माझी काळजी करा,आज म्हणतात ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र

Vinod Tawde's jingle; Earlier they said worry about me, today they say only Rashtra no Maharashtra

 

 

 

भाजप नेते विनोद तावडे यांनी काल मुख्यमंत्रिपदाबदद्ल जाहीरपणे वक्तव्य केलं होतं. विनोद तावडे यांनी त्या वक्तव्यावरून आज घुमजाव केलं आहे.

 

 

ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र म्हणत म्हणत मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज भारती जनता पार्टीचे केंद्रीय नेते विनोद तावडे

 

 

यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असलेला राष्ट्रीय पुस्तक न्यास या कार्यक्रमालासाठी उपस्थित लावली होती. त्यादरम्यान केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

 

 

काल नागपूर येथे विनोद तावडे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान भाजप सत्तेत आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने विचारला होता.

 

 

 

प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले, “हे माझ्याच हातात आहे.” पण, मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही. तुम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी पडली का?

 

 

केव्हातरी माझीही काळजी करा,” असं तावडेंनी म्हटलं होतं. ते नागपूर येथे मुख्यमंत्रिपदाबाबत बोलले होते. मात्र, त्यांनी या वक्तव्यावरुन घूमजाव करत ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र असं म्हंटलं आहे.

 

 

विनोद तावडे यांनी काल मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोबत चार राज्य जिंकून दिले आहेत, म्हणून येणाऱ्या २०२४ मध्ये विनोद तावडे मुख्यमंत्री होतील का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

 

 

विनोद तावडे म्हणाले, मुळात मी चार पाच राज्य जिंकून दिली या भ्रमात तरी मी नाही. खालचा जो आमचा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमचा विजय झाला आहे.

 

 

मी अनेकदा स्पष्ट केलं आहे “ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र” कारण मी तिथे शिकत आहे, खूप चांगलं काम करत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रातला एक माणूस इतर राज्यामध्ये चांगलं काम करत आहे.

 

 

त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल त्याच्या आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत विनोद तावडे मुख्यमंत्री होतील अश्या चर्चना पूर्णविराम दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *