“या 233” महाविद्यालयांवर विद्यापीठाने घातली प्रवेशबंदी ;पहा 233 महाविद्यलयांच्या नावाची संपूर्ण यादी

The university has banned admission to "these 233" colleges; see the complete list of names of 233 colleges

 

 

 

डॉ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून संलग्नित असलेल्या 23३ महाविद्यालयांना 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला निर्बंध घालण्यात आलेले असून ,

 

या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत यामुळे संलग्निकरण यादीतील 484 महाविद्यालयापैकी 233 महाविद्यालयात या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही.

 

विद्यापीठाकडून महाविद्यालयावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे . याबाबत माहिती अशी की विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या 21 नोव्हेंबर 2024 रोजी च्या ठरावानुसार कुलुगुरु डॉ. विजय फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले होते,

 

यासंदर्भात शैक्षणिक विभागासह प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरोदे यांनी वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयाने ट्रिपल ए मूल्यांकनाबाबत उत्सुकता दाखवली नाही ,

 

त्यामुळे अधिष्ठाता मंडळाने अशा 233 महाविद्यालयावर कारवाईचा बडगा उगारला असून या महाविद्यालयावर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. NAAC मूल्यांकनासाठी पात्र असूनही 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

विद्यापीठाच्या अधिपत्याखाली खालील छत्रपती संभाजीनगर, बीड ,जालना आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये विविध कला वाणिज्य विज्ञान संगणक व्यवस्थापन फार्मसी आर्किटेक्चर पत्रकारिता अशा शाखांचे विविध अभ्यासक्रम चालवले जातात

 

मात्र झिरो इंटेक ही टिप्पणी देऊन प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे . कोणकोणत्या महाविद्यालयावर प्रवेशबंदी घालण्यात आली त्या २३३ महाविद्यालयांची यादी खालीलप्रमाणे

 

“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 82 नुसार, शैक्षणिक अंकेक्षण (Academic Audit) विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांसाठी बंधनकारक आहे. मात्र, आजवर ही महाविद्यालये विद्यापीठ प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करत होती का? की सर्व माहिती असूनही प्रशासनच याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत होते? असा प्रश्न निर्माण होतो.

 

 

तुकाराम सराफ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *