भाजपच्या युवा नेत्याने रेल्वेखाली जीव दिला
A youth leader of BJP died under the train

भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आत्महत्येचं कारण आद्यप कळू शकलेलं नाही. ज्याठिकाणी आत्महत्या केली आहे तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही.
हा सगळा प्रकार काल मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील मधुकर धुमाळ (वय ३५, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेले भाजपा सरचिटणीसचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हडपसर रेल्वे मार्गावर एक मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सुनील धुमाळ असं त्या व्यक्तीच नाव होतं. प्राथमिक माहितीनुसार, सुनील यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुनील धुमाळ हे भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस या पदावर काम करत होते.
एक अॅक्टिव्ह नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. याचा पुढील तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत.