भारतात सुरु होतेय Starlink इंटरनेट;पहा स्पीड आणि खर्च किती
Starlink Internet is starting in India; see the speed and cost


भारताच्या डिजिटल युगात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीची उपकंपनी असलेली Starlink लवकरच
प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, कोर्टाने वाढीव मतदानाची याचिका फेटाळली
भारतात सॅटेलाइटच्या माध्यमातून हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. या सेवेचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण, दुर्गम आणि इंटरनेटपासून वंचित भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
Starlink ला भारत सरकारकडून ‘Letter of Intent’ (LoI) मिळालेला असून, आता शेवटचा टप्पा म्हणजे Global Mobile Personal Communication by Satellite (GMPCS) परवाना मिळणं बाकी आहे.
आता मोटारसायकललाही भरावा लागनार टोल टॅक्स
सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, स्टारलिंक भारतात आपली सेवा अधिकृतपणे सुरू करू शकेल. सध्या भारतात OneWeb आणि रिलायन्स जिओसारख्या काही मोजक्या कंपन्यांकडे सॅटेलाइट इंटरनेटचे परवाने आहेत, त्यामुळे स्टारलिंक ही एक तिसरी मोठी खेळाडू ठरणार आहे.
Starlink च्या इंटरनेट स्पीडबद्दल जागतिक स्तरावरचा अनुभव पाहता, भारतातही २५ Mbps ते २२० Mbps पर्यंतचा वेग मिळू शकतो.
मराठवाड्यात सत्तर लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
काही युजर्सना १०० Mbps पेक्षा जास्त स्पीड अनुभवास येतो. हा वेग वीडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाईन गेमिंग, वर्क फ्रॉम होम, आणि मोठ्या फायली डाऊनलोड करण्यासाठी पुरेसा आहे.
माहितीनुसार, भारतात ही सेवा लाँच करताना कंपनी एक परवडणारा अनलिमिटेड डेटा प्लॅन ऑफर करू शकते, ज्याची संभाव्य किंमत दरमहा फक्त $10 म्हणजेच अंदाजे ₹850 ते ₹900 इतकी असणार आहे. ही किंमत भारतातील ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मोठा आकर्षण ठरेल.
हिंदीचा मुद्दा तापला ;सहा जुलै रोजी मोर्चा
Starlink इंटरनेटचा सर्वात मोठा फायदा भारताच्या डोंगराळ, आदिवासी, व ग्रामीण भागांना होणार आहे. जिथे Fiber Optic नेटवर्क पोहोचलेलं नाही, तिथे सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळे थेट आकाशातून इंटरनेट मिळणार आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, डिजिटल व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ या गोष्टी सोप्या आणि सहज उपलब्ध होतील.
सहा वर्षांच्या मुलीला गळफास देऊन पोलिस शिपायाने स्वतः केली आत्महत्या
स्टारलिंकची ही सेवा ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला नवी चालना देईल. इंटरनेट हे आज केवळ करमणुकीचं माध्यम राहिलेलं नाही, तर ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि नागरिक सेवा यांसाठी अत्यावश्यक बनलं आहे.
सितारे जमीन पर चित्रपटातून बौद्धिक अक्षम विद्यार्थांना प्रोत्साहित केले
सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काही महिन्यांत Starlink सेवा भारतात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. एलन मस्क यांची ही योजना भारताच्या डिजिटल भविष्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल ठरेल, यात शंका नाही.