निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली

Fund allocation dispute unresolved, big moves in Mahayuti behind the scenes

 

 

 

निधीवाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतून सातत्याने नाराजीचे सूर उमटत असतानाच, शिवसेना मंत्र्यांची यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली.

 

 

या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी निधी वाटपाच्या मुद्यावर फॉर्म्युला सादर केला आहे. आता हा फॉर्म्युला महायुतीच्या समन्वय बैठकीत सादर केला जाणार आहे. आता हा फॉर्म्युला उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवारांना मान्य होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वनमंत्र्यांनी झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय घेतला मागे,

 

महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तिन्ही पक्षातील – शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी – आमदारांना समसमान निधी देण्याच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

 

 

महायुती सरकारच्या अंतर्गत निधीवाटपावरून अनेक आमदारांनी सार्वजनिक आणि खासगीरित्या नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः छोट्या मतदारसंघांतील आमदारांना अपेक्षित निधी मिळत नसल्याने नाराजी वाढली आहे.

 

ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये सोनिया,राहुल गांधींवर २००० कोटींचा घोटाळा केल्याचाआरोप

 

हीच पार्श्वभूमी लक्षात घेता शिवसेनेतील मंत्र्यांनी अंतर्गत बैठक घेत तिन्ही पक्षांमध्ये समसमान निधी वितरणाच्या धोरणावर चर्चा केली.

 

 

सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रस्ताव लवकरच महायुतीतील समन्वय समिती किंवा तीनही पक्षांचे प्रमुख नेते यांच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय त्या माध्यमातून घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

पत्रकार परिषद सुरु असतांना शिक्षणमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा फोन, दादा भुसे जागेवरून उठले अन्…;

दरम्यान, निधीच्या मुद्द्यावरून मंगळवारी भाजप आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पूरम यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची वाट अडवत सहाय्य निधीच्या गैरवाटपाचा जाब विचारला, ही घटना विधान भवनाच्या परिसरात घडली. त्यामुळे मंत्र्यांवर थेट दबाव वाढत असल्याचे दिसून येते.

 

 

या पार्श्वभूमीवर, अधिवेशनाच्या कालावधीतच महायुतीतील समन्वय समितीची किंवा थेट तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निधीवाटपाच्या मुद्द्यावरून होणारे वाद रोखण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

 

Related Articles