बोट बुडून चौघांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता
Major accident! Ferry carrying 65 passengers capsizes in the sea, four dead, many missing


इंडोनेशियातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बालीजवळ एक मोठा अपघात झाला आहे. सुमारे ६५ लोकांना बेटावर घेऊन जाणारी एक फेरी बोट रात्री उलटली.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे एका महिन्यात 135 मृत्यू
या अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. फेरीतील २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
एसटी बस चे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट
एएफपीने देशाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचा हवाला देत म्हटले आहे की, प्रवाशांनी भरलेली ही फेरी स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनीत बुडाली. ती इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावा येथून प्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे निघाली होती.
“माहितीनुसार, फेरीत एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते,” असे जावा-आधारित एजन्सीने सांगितले. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराकडे ५० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अर्ध्या तासाच्या आतच ही बोट बुडाली.
बान्युवान पोलिस प्रमुख रामा समतामा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह सापडले आहेत आणि २० जणांना वाचवण्यात आले आहे.
ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये सोनिया,राहुल गांधींवर २००० कोटींचा घोटाळा केल्याचाआरोप
बचाव केलेल्यांपैकी बरेच जण खवळलेल्या पाण्यात बेशुद्धावस्थेत तरंगत असताना आढळले. बेपत्ता लोकांच्या शोधात रात्रीपासून दोन टग बोटी आणि दोन फुग्याच्या बोटींसह नऊ बोटी कार्यरत आहेत. शोधकार्य सुरु असताना समुद्रात २ मीटर उंच लाटा उसळत होत्या, ज्यामुळे बचाव पथकाला अडचणी येत आहेत.
वनमंत्र्यांनी झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय घेतला मागे,
अशा प्रकारचा अपघात होण्याची हि पहिलीच वेळ नसून १७,००० बेटांचा आग्नेय आशियाई देश असलेल्या इंडोनेशियामध्ये सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोट अपघात होत आले आहेत.
निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली
लहान बेटांमुळे, वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात फेरी वापरल्या जातात. या वर्षी मार्चमध्ये, बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली, ज्यामध्ये एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला आणि किमान एक जण जखमी झाला होता.