जून मध्येच राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ
Big increase in water storage in dams in the state in June itself, Inflows in dams in the state increased, 17 dams in Raigad are full, 9 gates of Gosekhurd dam opened, read dam stock update


राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे . धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे .
गंगापूर धरणातून दुपारी बारा वाजता 3716 वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झालाय . नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत .
बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच २५ लाख लुटले, मराठवाड्यातील घटना
दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे . दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय . राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय .नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे .
राज्यातील बहुतांश मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली . पुण्यात गेल्या वर्षी 15 टक्क्यांवर असलेला उपयुक्त जलसाठा यंदा 58.21 टक्क्यांवर आहे .
रेल्वेचा मोठा निर्णय; आता केवळ याच लोकांना मिळणार लोअर बर्थ
नाशिकच्या ही बहुतांश धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी 17 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा 52.54 टक्क्यांवर आहे . मराठवाड्यातील ही बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे .
रायगड जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने अलिबाग मुरुड रोहा नागोठणे परिसराला झोडपून काढले .त्यामुळे धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे .जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 17 धरण 100 टक्के भरली असून रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उन्नई धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे .
निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली
धरणातून होणाऱ्या विसर्ग मुळे कुंडलिका नदी पातळीत मोठी वाढ झाली असून पाणी नदीपात्राच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे .
सध्या नदीची पाणीपातळी 23.10 मीटरवर पोहोचलीये .त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय .खबरदारीचा उपाय म्हणून कुंडलिका नदीवरील जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे .
पुणे घाटमाथासह शहरात तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे .
रेशनचं धान्य वाटप आता डिजिटल पद्धतीने
रात्रभर झालेल्या पावसामुळे रात्री बारापासून 6451 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय .पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली .
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेच्या पाण्यात सुरक्षित पवित्र स्नान करता यावे यासाठी उजनी धरणातून गेल्या काही दिवसांपासून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आज पूर्णपणे थांबविण्यात आला आहे .
सोन्याच्या दरात घसरण ;गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
गेल्या पंधरा दिवसांपासून उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता .त्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी सातत्याने कमी अधिक होत होती .
आता आषाढी सोहळ्याला केवळ तीन दिवस उरल्याने आजपासून उजनी धरणातला विसर्ग पूर्णपणे थांबवलाय .त्यामुळे सध्या पात्राच्या बाहेर आलेली चंद्रभागा उद्या पुन्हा पात्रात जाणार आहे . सध्या उजनी धरणात 102 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे .धरणात जवळपास 12,000 क्युसेक विसर्गने पाणी जमा होत आहे .
ठाकरे बंधूंच्या ५ जुलै च्या मोर्चोला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही
भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 15000 क्युसिक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरू आहे .धरणाचे पाच दरवाजे आणि दोन्ही जलविद्युत प्रकल्पातून हा पाण्याचा विसर्ग होतोय .
मागील चार दिवसात गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली .परिणामी धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं आज सकाळी 11:00 वाजल्यापासून हा विसर्ग सुरू केला .
पत्रकार परिषद सुरु असतांना शिक्षणमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा फोन, दादा भुसे जागेवरून उठले अन्…;
नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असा आवाहन गोसेखुर्द धरण प्रशासनाने केला आहे .दुपारी 2 वाजता गोसेखुर्द धरणाचे आणखी चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे .आता एकूण नऊ दरवाजातून 40,898 क्युसिक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे .
उत्तर महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय .धरणात 56 टीएमसी पाणीसाठा आहे .
न्यायाधीशासमोरच वकील प्यायला दारू ,न्याधीशांनी थेट….
महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला . बहुतांश मोठे प्रकल्प 50 ते 75% पर्यंत भरले आहेत .त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे .
वनमंत्र्यांनी झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय घेतला मागे,
कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज सकाळच्या सुमारास धरणात 28 हजार क्यूस एक वेगाने पाणी येत होते .गेल्या 24 तासात कोयना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा वाढलाय