बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच २५ लाख लुटले, मराठवाड्यातील घटना

A branch manager created a fake loan by playing online games, robbed 25 lakhs, stabbed himself, but was exposed!

bj admission
bj admission

 

 

 

सोलापूर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखाधिकार्‍याने २५ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचत स्वतःवर वार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय; आता केवळ याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

 

दोन अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून २५ लाख लुटल्याचा बनाव करणाऱ्या शाखाधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे.

बोट बुडून चौघांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता

कैलास घाटे असे या शाखाधिकाऱ्याचे नाव असून, त्याला ऑनलाईन गेम आणि खाजगी देणे झाले होते. त्याच कारणामुळे त्याने ही रक्कम स्वतःजवळ ठेवून लुटीचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना त्याने दिली आहे.

 

 

 

धक्कादायक म्हणजे, चोरट्यांनी हल्ला केल्याचे भासवण्यासाठी त्याने स्वतःच्या अंगावर शस्त्राने वार करून घेतले होते.

 

न्यायाधीशासमोरच वकील प्यायला दारू ,न्याधीशांनी थेट….

 

नळदुर्ग येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा शाखाधिकारी कैलास घाटे याने ३० जून रोजी पोलिसांना माहिती दिली की, तो २५ लाख रुपयांची रोकड सोलापूर येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात होता.

 

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर चापला तांड्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला ओव्हरटेक करून डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यात मिरची गेल्याने घाटेने दुचाकी थांबवली असता,

 

वनमंत्र्यांनी झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय घेतला मागे,

चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. घाटेने प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्याच्या छाती, पाठ आणि उजव्या खांद्यावर वार करून २५ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केल्याचा बनाव त्याने रचला होता.

 

ठाकरेंचा हल्लाबोलम्हणाले,महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा धुमधडाका CM सहीत उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा

या घटनेनंतर नळदुर्ग पोलिस स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच हा तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात हा शाखाधिकारी उघडा पडला. शाखाधिकार्‍याकडून त्याने लपवलेली रक्कम ही जप्त केली असून त्याला अटक देखील केली आहे.

 

 

Related Articles