उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर
Uddhav Thackeray had told Shinde, 'Don't stand up,' Shinde replied.'Don't stand up and say anything else...', Eknath Shinde's reply to Uddhav Thackeray


शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली.
ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,
या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही तीन वर्षांपूर्वी उठाव केला. आम्ही अन्यायाविरुद्ध उठलो. तीन वर्षांपूर्वी फक्त दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. ते आडवे झाले.
अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नहीं वगैरे बोलायचं त्यांना शोभत नाही. त्यासाठी मनगटात जोर लागतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं.
उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका
“मी एवढंच सांगेन, एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. तर दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही,
अजेंडा नाही असं काही लोकं म्हणत होते. त्यातील एका वक्त्याने ते पथ्य पाळलं. पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. हा फरक आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज आणि उद्धव युती झाली आता महाविकास आघाडी…
“मराठीबाबत बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं. त्यांचं अभिनंदन. ते राज्यगीत मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली. त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली.
मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील तुम्ही सोडलं नाही”, असं शिंदे म्हणाले.
राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
“आजचा मेळावा हा आगपाखड, द्वेष, जळजळ आणि मळमळ होती ते दिसून आलं. आम्ही मराठीसाठी काय केलं, आणि त्यांनी काय केलं? मुंबईचा मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मराठीचा टक्का मुंबईत का घसरला? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“दाढीवरुन पूर्ण हात फिरवला असता तर काय झालं असतं ते त्यांना विचारा. फ्लॉवर काय फायर ते पुढच्या निवडणुकीला विचारा”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस चार हात दूर
“लोकशाहीत कुणालाही कुणाबरोबर युती, आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तशा घटना घडताना दिसतील”, असं सूचक वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.








