पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला

Mahatma Gandhi statue attacked in Pune , Congress aggressive after attack on Mahatma Gandhi's statue; Harsh Vardhan Sapkal said angrily

bj admission
bj admission

 

 

पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल.

 

उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर

पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे. या विषवल्लीचा धोका संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त केला पाहिजे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

 

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करून हल्ला केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे नेते नाहीत,

राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

 

तर ते भारताच्या नैतिक अधिष्ठानाचे शिल्पकार आहेत. गांधीजींनी दिलेली सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता, आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये भारतीय लोकशाहीच्या मुळाशी आहेत. सहजीवन आणि धार्मिक सलोखा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गांधीविचार फक्त देशातच नाही तर संपूर्ण विश्वात मानले आणि आचरणात आणले जातात. जगातील बहुतांश देशात त्यांचे पुतळे उभारले आहेत.

 

9 जुलैपर्यंत धुमशान; वादळी वारे,मुसळधार पावसाचा अलर्ट

संपूर्ण विश्व गांधी विचारातून प्रेरणा घेते. संविधान न मानणारे कट्टरवादी विचारसरणीचे काही लोक आणि संघटना मात्र महात्मा गांधीजींचा द्वेष करतात. याच द्वेषातून महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती.

 

 

२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून या अपप्रवृत्तींना मोठ्या प्रमाणात बळ आणि पाठिंबा मिळू लागला. सरकारी छत्रछायेत या टोळक्यांनी महात्मा गांधीबद्दल अपप्रचार आणि गोडसेंचे उदात्तीकरण सुरु केले.

राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार

 

यातून सूरज शुक्लासारखे अनेक विखारी तयार झाले आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. या शुल्कावर UAPA अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून ही पिलावळ पुन्हा अशी हिंमत करणार नाही.

 

स्मार्ट मीटर च्या विरोधात जनतेचा उद्रेक , संघर्ष समितीने दिला इशारा

गांधीजींची हत्या करून यांना गांधीविचार संपवता आला नाही पुतळ्यावर कोयत्याने वार करून गांधीविचार संपणार नाही. गोडसेविचार हा विनाशाचा मार्ग आहे, गांधीविचार हीच देशाची दिशा आणि सत्य आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

 

 

Related Articles