भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ

BJP MP challenges Raj Thackeray, if he has the courage to come to Bihar and show it, he will be beaten

bj admission
bj admission

 

 

महाराष्ट्राच्या तुकड्यावर जगण्यासाठी यूपी बिहारमधून लोंढ्यावर लोंढे पाठवून सुद्धा फुकाचा आव आणणाऱ्या युपी बिहार आणि झारखंडमधील भाजपाई भैय्यांची महाराष्ट्राविरोधात आगपाखड सुरु झाली आहे.

इम्तियाज जलील यांचा दावा;शिंदेंकडून दगाफटक्याची भीती म्हणून राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचा

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यावर गरळ ओकल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक होत आहे.

 

मात्र, याच निशिकांत दुबेंची कुंडली वादाची आणि मुस्लीमांविरोधात गरळ ओकणारी आहे. मात्र, याच निशिकांत दुबेंना जेव्हा ऑपरेशन सिंदूरनंतर मुस्लीम देशात ओवैसी यांच्यासोबत जाण्याची वेळ आली तेव्हा लोकशाहीचे सौदर्य आठवले होते.

राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

 

इतकेच नव्हे, तर देशातील मुस्लीमांविरुद्ध गरळ ओकणाऱ्या याच निशिकांत दुबेंना सौदीला जाताना दहशतवाला धर्म नसतो हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आली होती. मुद्दा मराठीचा असताना निशिकांत दुबे यांनी माहीम दर्गा, उर्दू आणत अप्रत्यक्ष हिंदी सक्तीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर

निशिकांत दुबे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचे आव्हान दिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, जर राज ठाकरेंमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन ते दाखवावे.

 

भाजप अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव चर्चेत

त्यांना चोप दिला जाईल. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की तुम्ही कोणाची भाकर खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना तेव्हा बिहारमध्ये बांधला.

 

 

तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता. तुमच्याकडे कोणता उद्योग आहे, आमच्याकडे खाणी आहेत का? झारखंडमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेशात आहे, ओडिशामध्ये आहे, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?

 

राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार

दुबे म्हणाले की, रिलायन्सने रिफायनरी उभारली असेल तर ती गुजरातमध्ये उभारली गेली आहे. सेमीकंडक्टर उद्योगही गुजरातमध्ये येत आहे, तुम्ही बळाचा वापर करत आहात.

 

 

जर तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा. तुम्ही तुमच्याच घरात आहात. तुम्ही महाराष्ट्रात आहात. जर तुम्ही इतके मोठे साहेब असाल तर बिहारमध्ये या. उत्तर प्रदेशात या, आम्ही तुम्हाला चोप देऊ. आम्ही मराठीचा आदर करतो. मराठी ही एक आदरणीय भाषा आहे.

स्मार्ट मीटर च्या विरोधात जनतेचा उद्रेक , संघर्ष समितीने दिला इशारा

 

आम्ही छत्रपती शाहूजी आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो. यापूर्वी निशिकांत दुबे म्हणाले होते की, “मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारहाण करून पहा, आपल्या घरात कुत्राही सिंह असतो. तुम्हीच ठरवा कोण कुत्रा आहे आणि कोण सिंह आहे.”

 

दरम्यान, लोकसभेत अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीनंतर निशिकांत दुबे यांनी सडकून टीका केली होती. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी निशिकांत दुबे यांच्यावर प्रत्युत्तर देत त्यांच्यावर बनावट पदवी असल्याचा आरोप केला होता.

 

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला

निशिकांत दुबे यांच्यावर महुआ मोइत्रा यांनी दोन वर्षांपूर्वी बनावट एमबीए, पीएच.डी पदवी असल्याचा आरोप केला होता. महुआ यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लोकसभा अध्यक्षांना प्रश्न विचारला आणि विचारले होते की, प्रतिज्ञापत्रावर खोटे बोलू नये.

 

डीयूच्या एफएमएसमधून बनावट एमबीए पदवी मिळवणे आणि नंतर बनावट पीएच.डी करणे हे देखील लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा आधार नाही का? विशेषाधिकार समिती, तुम्ही हे ऐकत आहात का? 2020 मध्ये झारखंड उच्च न्यायालयात निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना

 

निवडणूक उमेदवारी अर्जात बनावट पदवी सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सीबीआय आणि भारतीय निवडणूक आयोगाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली होती.

 

 

 

Related Articles