सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना

Cyber ​​Crime News;Five lakh rupees scam due to 'Free Fire' game

bj admission
bj admission

 

 

लहान मुलांमध्ये मोबाईलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्या बाजूला सायबर क्राईममध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अशीच एक घटना कोल्हापुरात उघडकीस आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल

 

एका शेतकऱ्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने “फ्री फायर” गेम खेळताना नकळत पाच लाख रुपये उडवलयाची धक्कादायक घटना समोर आली.

 

ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस चार हात दूर

नवीन म्हशी घ्यायला पैसे किती जमा झाले आहेत हे पाहण्यासाठी बँकेत जाऊन रक्कम तपासले असता हा सर्व प्रकारसमोर आला असून खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रांजेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला.

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने स्वतःचा म्हशीचा गोठा उभा केला.

 

भाजप अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव चर्चेत

या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळत असल्याने ते हा गोठा आणखीन वाढवण्यासाठी दोघे नवरा बायको रात्रंदिवस कष्ट करून पैसे गोळा करून बँकेत जमा करायचे.

 

 

मात्र त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याची प्रचंड आवड होती तो सतत वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळायचा. मात्र, याकडे आई वडील दुर्लक्ष करायचे आणि हेच दुर्लक्ष त्यांना महागात पडले.

राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार

गेल्या अनेक वर्षांपासून पैसे गोळा करत असल्याने शेतकऱ्याने अखेर मे महिन्यात हरियाणातून चार म्हशी आणण्याचे ठरवले आणि यासाठी ते बँकेत किती पैसे गोळा झाले याची माहिती घेण्यासाठी गेले.

 

 

बँकेतील स्टेटमेंट तपासल्यानंतर शेतकऱ्याला धक्काच बसला. खात्यावर केवळ दोन लाख रुपये असल्याच बँक स्टेटमेंटमध्ये दिसत होते. बँकेकडे अधिक चौकशी केली असता बँकेने हातवर केले आणि पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.

9 जुलैपर्यंत धुमशान; वादळी वारे,मुसळधार पावसाचा अलर्ट

 

शेतकऱ्याने त्वरित सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी देखील वेगाने तपास करत बँक खात्यातील ट्रांजेक्शन तपासले.

 

स्मार्ट मीटर च्या विरोधात जनतेचा उद्रेक , संघर्ष समितीने दिला इशारा

 

तसेच शेतकऱ्याचा मोबाईल देखील तपासला. यावेळी काही रक्कम फ्री फायर गेममध्ये घेण्यासाठी यूपीआय पद्धतीने ट्रांजेक्शन केल्याच समोर आल.

 

अधिक तपास केला असता वडिलांच्या ज्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे सारखे यूपीआय आहे, त्या मोबाईलमध्ये “फ्री फायर” गेम खेळत असताना नकळत ट्रांजेक्शन केल्याचे समोर आले.

 

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला

सायबर हॅकरने अकाउंट हॅक करून आणखी पैसे घेतल्याचे देखील समोर आले असून याचा फटका या गरीब शेतकऱ्याला बसला आहे. मुले त्रास देऊ लागले की, आई वडिलांकडून त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत बसवले जाते.

 

 

 

Related Articles