शिंदेंचे मंत्री पोहोचले मनसेच्या मोर्चात गो बॅक… गो बॅक… चे नारे देत मंत्र्याविरोधात जनआक्रोश…
Shinde's ministers reached the MNS rally shouting slogans of 'Go back... Go back...', public anger against the minister...


मीरा-भाईंदरमध्ये मनसेने भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसे कार्यकर्त्यांच अटक सत्र सुरु होतं. पण हळूहळू जनमताचा रेटा वाढत गेला.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
मनसे मोर्चावर ठाम राहिली. अखेर पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली. या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते.
पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… अशी सुद्धा घोषणाबाजी जाली.
राज्यातील सर्व शाळा 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहणार
“मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडवण्यासाठी मी आलो होतो.
मराठी बांधवांना आणि मीरा-भाईंदरमधील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही आल्यावर जय गुजरातच्या घोषणा दिल्या. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे.
सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना
माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे”
भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ
मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय? यावर ते म्हणाले की, “अशावेळी मी कोणाला दोष देणरा नाही. माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती” “मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं,
ज्या पद्धतीने डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदपणे आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्याचा निषेध करण्यासाठी आलोय” मुख्यमंत्री म्हणातयात की, मोर्चाला परवानगी देणार होतो.
पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना
पण मोर्चाचा मार्ग असा होता की, वाद निर्माण होईल. त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं की, “व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल, तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे”
“मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितली होती तर ती त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरु केलेली आहे,
ही दादागिरी त्या भागाचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी ज्या काही मराठी लोकांची धरपकड सुरु केली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो.
मुख्यमंत्र्यांकडेही निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवावी”, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
यावर खासदार अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मीरा भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठीचा मोर्चा होता. मात्र सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाच उच्चाटन करायचा डाव मांडला.
तीन, साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक करता ही तर आणीबाणी आहे”, अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे.
“भाजपने संविधान हत्या दिन साजरा केला. मात्र भाजप रोज संविधानाची हत्या करते. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही हे संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान यांचं उत्तर द्यावं.
ही लोक लोकशाहीच्या मुळावर येणारी आहेत. पहलगाम विसरायचा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. मिडिया रोज या बातम्या दाखवत राहिल्यामुळे एक नेरेटीव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राने आधी हिंदीला विरोध केला नाही. हिंदी बोलतो म्हणून कधी मारलं नाही. सुशांत सिंहने आत्महत्या केली. बिहारच्या निवडणुकीत भाजपने त्याचा फोटो लावून प्रचार केला.
तुम्ही नही भुलेंगे, काय संबंध होता? आता देखील बिहार निवडणुकीसाठी ही सगळं सुरू आहे”, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.