चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?

ED files case against film actors and actresses; see what the case is? ,There is a stir in the film industry; ED takes major action against 29 celebrities, cases registered in serious cases

bj admission
bj admission

 

 

 

साऊथ सिनेइंडस्ट्रीतून मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणातील 29 सिनेकलाकार, यूट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर यांच्या विरोधात बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्सला प्रोत्साहन दिल्याबद्दल ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

 

भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

 

सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती , मंचू लक्ष्मी, प्रकाश राज , निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणीता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, यूट्यूबर हर्षा साई,

 

 

बय्या सनी यादव आणि लोकल बॉय नानी यांच्या नावांचा समावेश आहे. हे ॲप्स सामान्य लोकांना आर्थिक अडचणीत आणत असल्याच्या तक्रारीनंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’

मिळालेल्या माहितीनुसार, मियापूरमधील 32 वर्षीय व्यावसायिक फनिंद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रारीनुसार, अनेक तरुण आणि सामान्य लोक या सट्टेबाजी ॲप्समध्ये पैसे गुंतवत आहेत, ज्यांचे प्रमोशन प्रसिद्ध चित्रपटातील सेलिब्रिटी करत आहेत.

 

 

या ॲप्समुळे मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत, असं तक्रारीत नमूद केलं आहे. सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 सेलिब्रिटींविरुद्ध तेलंगणा गेमिंग ॲक्ट

 

सरकारचा मोठा निर्णय; आता पत्नीचेही नाव लागणार सातबारावर

 

आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार एफआयआर दाखल केला.ईडीनं आता या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे.

 

 

या तपासामध्ये, ह्या कलाकारांना जाहिरातीसाठी मिळालेले पैसे, त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ॲप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे ॲप्स तरुणांना सोप्या कमाईचं आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करत आहेत.

थेट आमदाराकडूनच कॅन्टीनवर काम करणाऱ्या वेटरला मारहाण

 

त्यांनी सांगितलं की, त्यांनी फक्त कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म A23 चं प्रमोशन केलं होते, जे 2023 मध्येच संपलं आहे.

 

सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी

“मी 2016 मध्ये एका ॲपचं प्रमोशन केलं होतं, पण नंतर ते चुकीचं आहे असं लक्षात आल्यावर मी त्यातून माघार घेतली,” असं प्रकाश राज म्हणाले.

 

BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान

तर राणा दग्गुबातीनं सांगितलं की, त्यानं जाहिरात करताना कायद्याचं पालन केलं होतं.या प्रकरणांमुळं तेलगू चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.ईडीच्या तपासामुळं या कलाकारांवर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles