राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यपदी शशिकांत शिंदे

Shashikant Shinde is the new regional president of the NCP Sharad Pawar group.

bj admission
bj admission

 

 

शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे. या पदावर आधी जयंत पाटील कार्यरत होते. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली.

 

चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?

पैकी लोकसभेला पक्षाचा घवघवीत यश मिळालं. तर विधानसभेला पक्षाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत पाटील यांना संधी दिली आहे. ते मूळचे सातारचे आहेत.

 

 

शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत साताऱ्यानं कायम साथ दिली आहे. विधानसभेत थेट सहाव्या क्रमांकावर फेकलेल्या पवारांच्या पक्षासमोर आता अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक

 

जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगलेल्या आहेत. त्यानंतर आता पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या रुपात प्रदेशाध्यक्षपदावर निष्ठावंताला संधी दिली आहे.

 

आयकर विभागाची थेट शिंदे गटाच्या मंत्र्याला नोटीस

साताऱ्याच्या कोरेगावातून येणारे शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते आमदार झाले. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपेल. याआधी ते २००९ आणि २०१४ मध्ये विधानसभेचे आमदार झाले.

 

 

जलसंधारण मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती. पक्षफुटीनंतर ते शरद पवारांच्या सोबत राहिले.

 

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्याचवर्षी लोकसभा जिंकलेल्या उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

 

 

त्यामुळे पोटनिवडणूक लागली. पवारांनी त्यांचे मिश्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेवेळी पाऊस झाला. शरद पवारांनी पावसात भाषण केलं आणि वातावरण पालटलं.

500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?

श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. त्यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का होता. पण शरद पवारांनी त्यावेळी या विजयाचं सेलीब्रेशन टाळलं.

 

कारण शशिकांत शिंदे या पवारांच्या निष्ठावंत शिलेदाराचा विधानसभेला पराभव झाला होता. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं.

 

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षानं २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांनी उदयनराजे भोसलेंना कडवी लढत दिली.

 

तुतारीसारखंच चिन्ह घेऊन लढणाऱ्या उमेदवारामुळे शिंदे यांचा पराभव झाला. भोसलेंना ५ लाख ६८ हजार ७४९, तर शिंदे यांना ५ लाख ३६ हजार ४७५ मतं मिळाली.

अजित दादांच्या आमदाराला लाडकी बहीण योजना ठरतेय डोकेदुखी?

 

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभेलाही शिंदे पराभूत झाले. सेनेच्या महेश शिंदे यांनी ४५ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. दोन विधानसभा आणि एक लोकसभा अशा सलग तीन निवडणुका शिंदे यांनी गमावल्या आहेत.

 

 

Related Articles