फडणवीसांचा शब्द;पण भाजपात प्रवेशाच्या दिवशीच जयंत पाटलांना मंत्रिपदाची शपथ पाहिजे ?
Fadnavis' words; but should Jayant Patil take oath as a minister on the day he joins BJP?


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. उन्हाळी अधिवेशनापाठोपाठ आता पावसाळी अधिवेशनातही जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा आहेत.
महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा
जयंत पाटलांना आता मोदी सरकारच्या योजना आवडू लागल्या आहेत, असं मिश्किल विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळात केलं.
त्यामुळे पाटील भाजपवासी होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे.
उद्धव ठाकरेंची या खेळीमुळे अटीमुळे मविआ अडचणीत?
तब्बल ३५ वर्षांपासून आमदार असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे प्रशासनाचा, मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मराठा चेहरा असलेले जयंत पाटील भाजपमध्ये यावेत यासाठी स्वत: फडणवीस प्रयत्नशील आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे पक्षप्रवेश करा. तुमचा योग्य सन्मान राखू, असा शब्द फडणवीस यांच्याकडून जयंत पाटलांना देण्यात आल्याचं समजतं. पण त्यावर पाटील समाधानी नाहीत.
नांदेड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदावरून घमासान
ज्या दिवशी भाजप प्रवेश होईल, त्याच दिवशी मंत्रिपदाचा शपथविधी होऊन लगेच मंत्रिमंडळातही पक्षप्रवेश व्हावा, अशी जयंत पाटलांची इच्छा असल्याची माहिती सांगलीतील सुत्रांनी दिली.
जयंत पाटील पाटबंधारे किंवा ऊर्जा मंत्रालयासाठी आग्रही आहेत. त्यातही पाटबंधारे खात्यात जयंत पाटलांना अधिक रस आहे. अर्थ, नियोजन, गृहनिर्माण, सहकारसारखी महत्त्वाची खाती सांभाळलेल्या जयंत पाटलांना भाजपमध्ये प्रवेश करताच लगेच पाटबंधारे खातं हवं आहे.
नांदेड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदावरून घमासान
जयंत पाटील यांना अशोक चव्हाणांचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. त्यांच्याप्रमाणेच तुमचाही सन्मान राखू असा शब्द देण्यात आलेला आहे. पक्षात या, थोडा संयम राखा.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर मंत्रिमंडळात बरेच बदल होणार आहेत. तेव्हा तुम्हाला संधी देऊ, असं जयंत पाटील यांना सांगण्यात आलेलं आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा,आंतरवाली सोडली तर….. !
विशेष म्हणजे अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळा प्रकरणात सीबीआयनं विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेलं होतं.
पुढे ते भाजपमध्ये गेले. आता त्यांच्याच मंत्रिमंडळात काम केलेले जयंत पाटीलही भाजपमध्ये जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जयंत पाटील यांची IL&FS प्रकरणात ईडीकडून चौकशी झालेली आहे.
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून जयंत पाटील शांत असल्याची चर्चा आहे. मस्साजोग ते मराठी भाषा अशा कोणत्याच प्रकरणात त्यांनी सरकारला धारेवर धरलेलं नाही. त्यांच्या या मौनाचा अर्थ सूचक मानला जात आहे.