बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

MLAs protest wearing vests, 'Chaddi Vestiyan Gang' slogans rock the legislature

bj admission
bj admission

 

 

विधिमंडळात सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे चड्डी बनियान गँगचा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांना शिळं जेवण दिल्याबद्दल मारहाण केली होती.

 

 

 

तोकड्या कपड्यांवर असलेल्या गायकवाड यांचा हा मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. आदित्य ठाकरेंनी सभागृहात चड्डी बनियान गँग म्हणत शिंदे गटाचा चिवचलं होतं.

 

इम्तियाज जलील यांचा दावा;शिंदेंकडून दगाफटक्याची भीती म्हणून राज-उद्धवना एकत्र आणण्याचा प्लॅन फडणवीसांचा

त्यानंतर यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आज काही आमदार बनियान घालून आले होते. कमरेला टॉवेल गुंडाळला होता. यावेळी त्यांनी चड्डी बनियान गँगच्या घोषणाही दिल्या.

 

 

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.

चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?

 

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियान घातली होती.

 

 

कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,

आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सतेज पाटील, महेश सावंत या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, चड्डी बनियान गँगने महाराष्ट्रात हैदोस घातला आहे. कँटिनमध्ये जाऊन आमदार कर्मचाऱ्याला मारहाण करतात.

 

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवत. कुणी चड्डी-बनियानवर घरात बसून ओम फट म्हणतं. चड्डी बनियान गँगची दहशत पूर्वी महाराष्ट्रात होती.

 

 

ही गँग शेतात, वस्त्यांवर दरोडे टाकायची. आताची चड्डी बनियान गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

संजय गायकवाड गेल्या आठवड्यात आमदार निवासातील कँटिनमध्ये बनियान आणि टॉवेलवर जाऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 

 

त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

 

500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?

तसंच याच दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते आपल्या बेडरुममध्ये बनियानवर बसलेले दिसत होते. त्याआधी मंत्री भरत गोगावले यांच्याही घरातील टॉवेलवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

 

 

 

Related Articles