राज्यातील ‘या’ शहराला 4 वंदे भारत ट्रेन
4 Vande Bharat trains to this city in the state


रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण
या 4 वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या 4 वंदे भारत ट्रेनचे थांबे कोणत्या स्टेशनवर असतील बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सायबर क्राईम;’फ्री फायर’ गेम मुळे लागला पाच लाखांचा चुना
पुणे-शेगाव वंदे भारत या ट्रेनचे थांबे दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे असण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे.
भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात, अशा भाविकांसाठीच ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल
पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. सध्याचा पुण्यावरून वडोदऱ्याला जाण्यासाठी 9 तासांचा वेळ लागतो, मात्र वंदे भारतने हा प्रवास 6 ते 7 तासांत होणार आहे.
या ट्रेनमुळे व्यावसायिकांना खास फायदा होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे-सिकंदराबाद ही वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा येथे थांबण्याची शक्यता आहे. या वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ 2-3 तास कमी होणार आहे. ही नवीन ट्रेन व्यवसायिक,
तांत्रिक आणि आयटी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
पुणे-बेळगाव ही वंदे भारत ट्रेनचे सातारा, सांगली, मिरज येथे थांबण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागाचा पुण्याशी संपर्क वाढणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचे 2-3 तास वाचण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्रालय सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली जाणार आहे.
इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती
यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी आणि सांस्कृतीक राजधानी जोडली जाणार आहे. या स्लीपर ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील व्यवसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना फायदा होणार आहे.