पतीच्या खुन्यांना अटकेच्या मागणीसाठी अधीक्षक कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडे यांचा विष प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न
Dnyaneshwari Munde attempts suicide by ingesting poison in front of the Superintendent's office, demanding the arrest of her husband's murderers.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा तूफान चर्चेत आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांकडून सातत्याने गंभीर आरोप केला जात आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास हा एसआयटी किंवा सीआयडीच्या मार्फत व्हावा, अशी मागणी मुंडेंच्या कुटुंबियांची होती. महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने पूर्ण झाली आहेत.
शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
मात्र, अजूनही समाधानकारक तपास झाला नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामध्येच आज कुटुंबिय आक्रमक झाले.
परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण खुनानंतर तब्बल 18 महिने उलटले आहेत. पण आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठ्यावर चकरा मारत आहेत. मुंडे यांच्या पत्नींनी यापूर्वी काही गंभीर आरोप केली आहेत,
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
अजूनही आरोपी मोकाट आहेत, तर चौकशीलाही वेग नाही. शेवटी हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या थेट एसपी ऑफिसला पोहोचल्या होत्या.
ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीड पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवरच ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली.
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांसमोरच काही वेळातच वैतागून अचानकपणे विष प्राशन केल्याने परिसरात खळबळ उडाली.
यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार
बीडमधील गुन्हेगारी संपेना! माजी पोलीस अधिकारी प्रकरणाने खळबळ, अजित पवार कारवाई करणार
यावेळी पोलिस बंदोबस्त चोख लावण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण पाहवयास मिळत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेरच मीडियाशी संवाद साधला आणि यानंतर परत त्यांच्या गाडीत बसल्यानंतर पॉइजन घेतल्याची माहिती मिळाली आहे. बेशुद्ध अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले असून
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल
या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपींची भेट घेतली होती. अधिकच्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडेंना हलवण्यात आल्याची माहिती मिळतंय