सरकारकडून चक्क सफाई कामगाराची शिक्षक म्हणून नियुक्ती
Government appoints a sanitation worker as a teacher


राज्यातील मराठी शाळा बंद पडू देणार नाही आणि शिक्षकांची भरतीही करण्यात येईल, असा दावा करणाऱ्या राज्य सरकारने शिक्षक म्हणून चक्क सफाई कामगाराची नियुक्ती केली आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर पालकमंत्री असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगर परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न
परिषदेच्या शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद रिक्त असल्याने शिक्षक म्हणून सफाई कामगाराला नेमण्याचा आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळामंध्ये शैक्षणिक पात्रता आणि अर्हता असणारे शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना ‘टीईटी’ आणि ‘टेट’सारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.
मात्र, या सर्वांना केराची टोपली दाखविण्याचे काम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक शंकर जाधव यांची बदली राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत करण्यात आली. त्यामुळे तेथील जागा रिक्त झाली.
राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
अशा परिस्थितीत जाधव यांच्या जागेवर शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने, कोणाला नेमायचे अशा प्रश्न निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी त्या रिक्त जागेवर सफाई कामगार चेतन चंडाले यांची नियुक्ती केली.
‘नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार रमेश चंडाले यांची विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला अनुज्ञेय राहणार नाही,’
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
अशा आदेशाचे परिपत्रक मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी काढले. विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी शालेय शिक्षण, मराठी शाळा, शिक्षक भरतीबाबत भरपूर आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात ते पालकमंत्री असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे शिक्षक संघटनांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
शिक्षण सेवकाची बदली करून त्या जागी सफाई कामगार अध्यापनासाठी नियुक्त करण्याची बाब अनाकलनीय म्हणावी लागेल. सफाई कामगार उच्च शिक्षित असला, तरी शिक्षक होण्यासाठी ठरावीक अर्हता आवश्यक असते.
भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश
त्यासाठी सरकारने नियम ठरवले आहेत. अशा वेळी शिक्षकाऐवजी सफाई कामगार किंवा अन्य संवर्गातील नियुक्तीचे समर्थन कसे करणार? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?
सफाई कामगार नियुक्तीचा आदेश त्वरित रद्द करावा. त्याचप्रमाणे असे प्रकार टाळण्यासाठी शाळांमध्ये पात्र शिक्षकांची लगेच नियुक्ती करावी,’ अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सरकारला आणि शिक्षण आयुक्तांना केली आहे.