अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर ?
US President Donald Trump visits Pakistan

जगभरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या उलथापालथी घडवणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?
पाकिस्तानी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, ट्रम्प सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करू शकतात.
हा दौरा खरा ठरला, तर सुमारे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन अध्यक्षाचा पाकिस्तान दौरा ठरणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची या खेळीमुळे अटीमुळे मविआ अडचणीत?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला भेट दिली होती.
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
त्या भेटीदरम्यान, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतरच, ट्रम्प पाकिस्तानला भेट देतील अशी शक्यता पाकिस्तानी मीडिया सातत्याने व्यक्त करत आहे.
फडणवीसांचा शब्द;पण भाजपात प्रवेशाच्या दिवशीच जयंत पाटलांना मंत्रिपदाची शपथ पाहिजे ?
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प सप्टेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये येऊ शकतात. या दाव्यांवर अद्यापही व्हाईट हाऊस किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, जनतेमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
कर्ज मंजूर झालं,सातबारावर बोजा पैसे मात्र मिळाले नाही;मौलाना आझाद कर्ज योजनेत फसवणूक
जर ट्रम्प यांचा दौरा खरा ठरला, तर तो ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, १९ वर्षांपूर्वी २००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.
त्यांच्याआधी २००० मध्ये बिल क्लिंटन यांनीही पाकिस्तान दौरा केला होता, मात्र ती भेट काही तासांचीच होती.
सरकारकडून चक्क सफाई कामगाराची शिक्षक म्हणून नियुक्ती
त्यामुळे गेल्या दोन दशकांत अमेरिकन अध्यक्षांनी पाकिस्तानला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. हा दौरा केवळ राजकीय नव्हे, तर भू-राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
विधानभवनात प्रवेशासाठीचे पास चक्क ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप
अमेरिका, चीन आणि भारत यांच्यातील नाजूक संतुलन बघता, ट्रम्प यांची पाकिस्तान भेट जागतिक राजकारणात नवा मोड आणू शकते.
पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध नेहमीच घट्ट राहिले आहेत. चीनची ‘बेल्ट अँड रोड’ योजना असो किंवा ग्वादार बंदर प्रकल्प – पाकिस्तानमध्ये
चक्क मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्राचे वाटप;उपायुक्तावर निलंबनाची कारवाई
चीनचे आर्थिक आणि सामरिक हितसंबंध खोलवर रुजले आहेत. मात्र, अलीकडे पाकिस्तान अमेरिकेकडेही मैत्रीचा हात पुढे करत आहे.








