राज ठाकरेंसोबत एकत्र आल्याने मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंकडे काय प्रतिक्रिया दिली
How did the Muslim community react to Uddhav Thackeray for coming together with Raj Thackeray?

ठाकरे बंधू एकत्र आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं
तसेच आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. उद्धव ठाकरेंनी सामना ला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे.
विधानभवनात प्रवेशासाठीचे पास चक्क ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप
आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात.
आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला.
मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणे आनंद व्यक्त करतात.
विधानभवनात प्रवेशासाठीचे पास चक्क ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप
गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’, त्यांना झालेला हा आनंद मी बघतो.
पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू.
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ईडीकडून अटक
याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा?, असं प्रश्न संजय राऊतांनी विचारताच लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार..
आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठी. लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं. आता 20 वर्षांनी एकत्र आलो. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही.
RBI NEWS: आरबीआयकडून महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई, विविध कारणांसाठी आर्थिक दंड ठोठावला
मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. याबाबत राज ठाकरे सोबत चर्चाही होईल. पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय.
हेही नसे थोडके, हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवसेना आणि मनसे,
कर्ज मंजूर झालं,सातबारावर बोजा पैसे मात्र मिळाले नाही;मौलाना आझाद कर्ज योजनेत फसवणूक
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मविआचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो. मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे. ठाणे स्वतंत्र विषय आहे,
हैद्राबाद एअरपोर्टवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
असं संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत सांगितले. यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही.
एकनाथ शिंदे गटाचे मंत्री म्हणाले ठाकरे ब्रँड संपणार नाही
राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.









