सुनील तटकरेंच्या पत्रकारपरिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये तुफान राडा

A storm of protest erupted in Latur from Chhawa Sanghatana workers during Sunil Tatkare's press conference.

bj admission
bj admission

 

 

लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज लातूरला आले होते. ते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले.

 

 

त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडीओवरुन सुनील तटकरे यांना निवेदन दिले.

पदावर असतांना तत्वाच्या गप्पा मारणाऱ्या माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना

 

यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्यासमोर आक्रमक झाले. त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.

 

 

यावेळी सुनील तटकरे यांनी विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं. पण नंतर मोठा राडा झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

 

आयकर विभागाची थेट शिंदे गटाच्या मंत्र्याला नोटीस

छावा संघटनेने सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण केली.

 

 

यावेळी राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हेदेखील दिसत आहेत.

 

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न

“मी काही तुमच्यासोबत भांडायला आलेलो नाही. पण राज्याच्या कृषीमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही आमच्या छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरुपामध्ये हे पत्ते आणले आहेत.

 

हे पत्ते तुम्ही कृषीमंत्र्यांना द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभेचं सभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातील कष्टकऱ्यांचं आणि कायदा तयार करणारं सभागृह आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण

त्याठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. ती पत्ते खेळायची जागा नाही. तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत. तुम्ही त्यांना मंत्री केलं आहे.

 

 

तुम्ही त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका. त्या व्यक्तीमुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे”, असं छावा संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले. यावेळी सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन घेतले. पण पत्रकार परिषदेनंतर मोठा राडा झाला.

 

महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर इन्कम टॅक्स चे छापे

दरम्यान, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं. “कृषीमंत्री गंभीर जरुर आहेत. ते गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की तुमच्यासोबत बोलेन. त्यांना कृषीमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे. कुणाच्या मनात संशय असण्याचं कारण नाही.

500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?

पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळेल. एक बाब आहे, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील आहोत”, असं सुनील तटकरे म्हणाले.

 

 

Related Articles