काँग्रेसचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची 280 जणांची टीम

Congress's big decision; Congress team of 280 members for local body elections

bj admission
bj admission

 

 

राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस  पक्षाने हि नवी खेळी आखली आहे.

 

 

नव्या प्रदेश कार्यकारणी मध्ये 40 टक्के जागा या ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीत 280 जणांची नवी टीम असणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

यातील 280 जणांच्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीला पाठवली असल्याचे हि पुढे आले आहे.

 

पुढे आलेल्या माहितीनुसार, या 280 जागांमध्ये 40 टक्के ओबीसी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महिलांसाठी 15 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ,नसता गांजा लागवडीला परवानगी द्या

तर कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के कार्यकारिणीत नेत्यांचा समावेश असणार हे हि आता निश्चित झाले आहे. यामध्ये एकुण 280 जणांची कार्यकारणी असणार आहे.

 

त्यापैकी 40 टक्के ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व असणार आहे. अनुसुचीत जाती आणि जमातीसाठी 16 ते 17 टक्के जागा असतील. तर अल्पसंख्याकसाठी 18 ते 19 टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे.

आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड

सोबतच खुल्या प्रवर्गासाठी 25 ते 28 टक्के जागा राखीव असणार आहे. यासह महिलांसाठी विशेष 15 टक्के जागा राखीव असणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

दुसरीकडे नव्या कार्यकारिणीत पदांची संख्या कशी असणार यासंदर्भात हि माहिती पुढे आली आहे. ज्यामध्ये जनरल सेक्रेटरी 110 ते 115 पर्यंत संख्या असणार आहे.

कर्ज मंजूर झालं,सातबारावर बोजा पैसे मात्र मिळाले नाही;मौलाना आझाद कर्ज योजनेत फसवणूक

सेक्रेटरी 105 ते 108 पर्यंत संख्या असणार आहे. तर पाच वरिष्ठ प्रवक्ते आणि एक मीडिया समन्वयक असणार आहे. ज्यामध्ये खजिनदार – 1, वरिष्ठ उपाध्यक्ष – 15 ते 20, उपाध्यक्ष 35 ते 40, असणार आहे.

 

तर प्रदेश कार्यकारणीमध्ये 40 टक्के सदस्य हे विदर्भातील असणार आहेत. अशी देखील माहिती पुढे आली आहे. राज्यभरातील ओबीसी मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रयत्न होतोय.

कृषिमंत्री कोकाटे पुनः गोत्यात ,म्हणाले “शासन भिकारी”

तर यावेळी विदर्भावरती हि काँग्रेस अधिक फोकस करत असल्याचे बघायला मिळत आहे. परिणामी या नव्या खेळीचा भाजपाला कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी सर्व स्थरावर जोरदार तयारी सुरु केलं असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Related Articles