राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Signs of major reshuffle in the state government

bj admission
bj admission

 

 

राज्यातील काही वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरचा रस्ता दाखवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाने तर राज्यातील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची बातमी दिली आहे.

 

भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ

त्यामुळे राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे.

 

भाजपच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची नवी अपडेट दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.

 

सुधीर मुनगंटीवार यांना राज्यातील फेरबदला विषयी विचारले असता त्यांनी असा कोणताही फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. अशी कुठलीही चर्चा कोअर ग्रुप मध्ये झालेली नाही,

 

शिंदेंचे मंत्री पोहोचले मनसेच्या मोर्चात गो बॅक… गो बॅक… चे नारे देत मंत्र्याविरोधात जनआक्रोश…

मंत्रिमंडळा बाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, केंद्रीय स्तरावर होत असतो, अशा प्रकारच्या काही बदल होणार असेल तर तो वेळेवर कळतो. पण सध्या असा काही बदल होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

विधानसभा अध्यक्ष बदलला जाण्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यावर मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल मला सध्या काही माहीत नाही.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण

पण सध्या असा काही फेरबदल होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. पुढे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत.

 

 

त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही असं मला वाटतं, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

 

पतीच्या खुन्यांना अटकेच्या मागणीसाठी अधीक्षक कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडे यांचा विष प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही फेरबदलावर प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष बदलायचा की नाही हे पक्ष बघेल. पक्षाची जी इच्छा असेल तिच माझी इच्छा असेल.

 

 

अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. पद गेलं तर आनंद कसा होईल?तुमच्या आशीर्वादाने नवीन काही जबाबदारी मिळत असेल तर आनंदच होईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

 

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर ?
माझा पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही ते म्हणाले. तसेच जनतेच्या हितात जे निर्णय आहे ते सरकार घेईलच, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

Related Articles