उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यातील खासदाराला थेट अमित शाहांचा फोन
Amit Shah directly calls Uddhav Thackeray's Marathwada MP


केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाहांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही आपल्या खासदाराला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न
तुम जियो हजारो साल पण ते हजार वर्षे आमच्यासोबत राहा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी नागेश पाटलांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एकाच दिवशी वाढदिवस. उद्धव ठाकरेंना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत होत्या.
सर्व कार्यक्रम रद्द करून एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी
स्वतः राज ठाकरेंनीही त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी केंद्रीय मंत्री अमित शाहांनी ठाकरेंचे खासदार नागेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकच चर्चा सुरू झाली.
उद्धव ठाकरेंनी नागेश पाटील यांना फोन केला. त्यांना आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आणि कायम आपल्यासोबत राहा असं सांगितलं.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
त्यावर आष्टीकरांनीही ‘त्यात काय प्रश्नच नाही’ असं म्हणत त्यांना विश्वास दिला. ‘तुम जियो हजारो साल पण हजार साल सोबत रहा’ असं उद्धव ठाकरे हे नागेश पाटील आष्टीकरांना म्हणाले.
एरवी नागेश पाटील आष्टीकरांचा वाढदिवस हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सेलिब्रेशनपुरता मर्यादीत असतो. पण यंदा मात्र थेट अमित शाहांनी फोनवरुन शुभेच्छा दिल्याने आष्टीकरांच्या वाढदिवसाची मोठी चर्चा झाली. शाहांचा एक फोन आला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीत मविआने मुसंडी मारली आणि 31 खासदार निवडून आले. त्यातले 9 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत.
त्याचवेळी केंद्रातील सरकार स्थिर करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा सुरु झाली. ठाकरेंचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं तर
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना शिंदेंच्या कानपिचक्या
कधी गिरीश महाजनांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. अशातच शाहांनी आष्टीकरांना केलेल्या फोनमुळे पुन्हा जुन्याच चर्चा नव्याने रंगू लागल्या आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेतला आऊटगोईंगचा सिलसिला थांबायला तयार नाही. ठाकरेंच्या खासदारांवरही भाजप आणि शिंदेसेनेची नजर असल्याची कुजबूज अधूनमधून होते.
मंत्रिमंडळातून ‘या’ चार मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
त्यामुळेच अमित शाहांनी आष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छा केवळ सदिच्छेपोटी होत्या की यात आणखी काही अर्थ दडलाय हे येत्या काळात स्पष्ट होईल.







