बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव आणि राज, ठाकरे बंधुभेट

Uddhav and Raj, Thackeray brothers meet in Balasaheb's room

bj admission
bj admission

 

 

27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस त्यांच्यासाठी एका क्षणामुळे खास झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपले मोठे बंधु उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले.

राहुल गांधी म्हणाले ‘नरेंद्र मोदींमध्ये नाही दम’ पाहा;Video

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. भविष्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान ठाकरे बंधुंच्या भेटीत नेमकं काय घडलं? याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊया.

 

उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मातोश्रीवर सकाळपासूनच येत होते. उद्धव सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते.

आयुष्मान कार्डवर आता ‘या’ आजारांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत

दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊतांना फोन आला. संजय राऊतांनी फोन उचलला तेव्हा समोर राज ठाकरे बोलत होते.

 

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी येत असल्याचे त्यांनी राऊतांना सांगितले. यानंतर शिवतिर्थावरुन राज ठाकरे आपल्या कारमधून निघाले. सोबत मनसे बाळा नांदगावकर, अविनाश जाधव असे मनसेचे नेतेदेखील होते.

 

एकनाथ खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ अटकेनंतर काय म्हणाले खडसें
मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले. राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी बाळासाहेबांच्या खोलीत काही वेळ घालवला.

 

 

बाळासाहेब ठाकरेंचा पलंग, कपाट, पुस्तके, कपडे आजही जशास तसे जपलेली मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीत राज ठाकरे गेले.बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत ठाकरे बंधुनी एकत्रीत वेळ घालवला. यावेळी दोन ठाकरे भाऊ सोडून खोलीत कुणीही नव्हते.

 

हवामान विभागाचा अलर्ट ;या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या खोलीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. थोड्या वेळानं रश्मी ठाकरेही राज-उद्धव ठाकरेंसोबत बाळासाहेबांच्या खोलीत आल्या.

 

 

त्यानंतर संजय राऊत, बाळा नांदगावकर , अविनाश अभ्यंकर खोलीत आले. यादरम्यान केवळ पारिवारिक चर्चा आणि चहा नाश्ता झाल्या.

 

एकनाथ शिंदे यांच्याचं मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का?
नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षानी भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो.

 

 

आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

 

एकनाथ खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ अटकेनंतर काय म्हणाले खडसें
मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला.

 

ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले.

 

सुनील तटकरेंच्या पत्रकारपरिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये तुफान राडा
दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर केलीये. दोन भाऊ भेटले म्हणून आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, असंही दरेकर म्हणालेत.

 

 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीविरोधात महायुतीचा प्लान बी नुकताच समोर आला आहे. जिथं महायुती कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नसून, त्याचसाठी आता रणनिती धुरंधरांकडून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीच्या अनुषंगानं विचार केला जात असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

एमबीबीएस डॉक्टरच निघाला ड्रग तस्कर

ठाकरेंच्या युतीविरोधात महायुतीचे ‘नो रिस्क’ धोरण असल्याची माहिती समोर आली आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीने एक आराखडा तयार केला असून, यामध्ये जिथं वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

Related Articles