बॅलेट पेपरवर लोकसभा निवडणुका घ्या, EVMवर नको; खासदार संजय राऊत

Conduct Lok Sabha elections on ballot paper, not on EVM; MP Sanjay Raut

 

 

 

देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गेली आहे.

 

 

ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. EVM मशीन वरती मोठा कॉन्फिडन्स आहे,असा टोला देखील राऊतांनी भाजपला दिला आहे.

 

 

संजय राऊत म्हणाले, ईव्हीएम आहे तर सर्व मुमकीन आहे. EVM मशीनवर मोठा कॉन्फिडन्स आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा तुम्ही ते ऐकत नाही कारण तुम्ही हरणार आहे.

 

 

तुम्ही स्वतःला महाशक्ती मानत आहात इतर देशात बॅलेट पेपरवर निवडणूक होतात या ठिकाणी तुम्ही निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाहीत?

 

 

प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री आहेत. भाजप सत्तेत नसताना ते विरोधी पक्षात होते, विरोधकांच काम आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे जर प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तर आम्ही उभं राहून प्रश्न विचारणार

 

 

 

तो संविधानाने दिलेला आम्हाला हक्क आहे. अमित शहा यांनी संसदेत येऊन संसदेत घुसखोरी कशी झाली याचं उत्तर त्यांनी द्यावं तर ते त्याची उत्तर बाहेर देतात, असेही संजय राऊत म्हणाले.

 

 

नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत .लढवय्ये नेते आहेत

 

 

भाजपचे असे अनेक नेते आहेत .त्यांच्यावरती असे अनेक खटले चालले पाहिजेत, कारवाया झाल्या पाहिजे पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत त्यांच्याच आमदारकी रद्द होत आहे.

 

 

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या दोन दिवस राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू असताना राऊत नाशिक मुक्कामी जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

 

 

सुधाकर बडगुजर संजय राऊतांचे निकटवर्तीय आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबतची पार्टी आणि पदाचा गौरवापर करीत मनपाची फसवणूक केल्याप्रकारणी बडगुजर यांची सध्या चौकशी सुरू आहे . पोलीस यंत्रणांच्या कारवाई बाबत संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *