रशियात महाभूकंप; हिरोशिमावरील 14,300 अणुबॉम्बशी तुलना?
Great earthquake in Japan; Why compare it to 14,300 atomic bombs on Hiroshima?


रशियाजवळील द्वीपसमूहाला 8.8 तीव्रतेच्या भूकंपाने हादरा दिला. जपानसह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये त्यामुळे धडकी भरली आहे. हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला.
चित्रपट क्षेत्रातील अभिनेते,अभिनेत्रींवर ईडीने केला गुन्हा दाखल;पाहा काय आहे प्रकरण ?
जवळपास 14,300 अणुबॉम्बच्या एकाच वेळी झालेल्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेशी त्याचा संबंध जोडण्यात येत आहे.
रशिया, जपान आणि भारत सारख्या देशांना त्याचा काय धोका होऊ शकतो? या भूकंपाची ताकद, त्याचा वैज्ञानिक आधार आणि जागतिक परिणाम काय असतील?
शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर वा मोमेंट मॅग्निट्यूड स्केलवर मोजण्यात येते. ही एक लॉगरिदमिक असते. याचा अर्थ तीव्रतेतील प्रत्येक एकक वाढीमुळे भूकंपाची ऊर्जा सुमारे 31.6 पट वाढते.
उदाहरणार्थ, 8.8 तीव्रतेचा भूकंप 7.8 तीव्रतेच्या भूकंपापेक्षा 31.6 पट जास्त ऊर्जा सोडतो. 6.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या तुलनेत, तो सुमारे 1,000 पट जास्त प्राणघातक असू शकतो.
नांदेड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदावरून घमासान
8.8 या तीव्रतेचा भूकंप, महाभूकंपात मोडतो. त्यामध्ये संपूर्ण शहर उद्धवस्त करण्याची क्षमता असते. शास्त्रज्ञानुसार, 8.8 तीव्रतेचा भूंकप 9 x 10^17 ज्युल ऊर्जा बाहेर टाकतो.
हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्बने सुमारे 15 किलोटन टीएनटी (6.3 x 10^13 जूल) ऊर्जा निर्माण केली होती. आता 8.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या (9 x 10^17 जूल) एकूण उर्जेची या बॉम्बशी तुलना जर केली तर, (9 x 10^17) ÷ (6.3 x 10^13) = 14,300
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण
म्हणजे हा महाभूकंप जवळपास 14,300 हिरोशिमा अणुबॉम्ब इतकी ऊर्जा बाहेर टाकतो. म्हणजे ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळेच या महाभूकंपाची तीव्रता भयावह आहे. त्सुनामीचा धोका त्यामुळेच वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
8.8 तीव्रतेचा हा महाभूकंप कामचटका द्वीपसमूह हा रशियात येतो. हा द्वीपसमूह हा जपानच्या अगदीजवळ आहे. हे क्षेत्र Pacific Ring of Fire मध्ये येते.
पृथ्वीची टेक्टोनिक प्लेट्स सतत एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे होणारे भूकंप सामान्य आहेत. 2011 मध्ये आलेला तोहोकु भूकंप हा 9.0 तीव्रतेचा होता.
अजित दादांच्या आमदाराला लाडकी बहीण योजना ठरतेय डोकेदुखी?
हा जपानच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप ठरला. या महाभूकंपाने त्सुनामी आली. त्याचा फटका फुकुशिमा अणु संयंत्रमधील रेडियोएक्टिव गळतीने झाला.
500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?
भारताच्या तामिळनाडू, आंध्र प्रदेशासह इतर अनेक राज्यांना त्यावेळी त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यामुळे केवळ जपानच नाही तर भारतासारख्या देशाने सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे.
या भूकंपाने मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या आहेत. भूकंपाचा फटका एकट्या रशियालाच बसला नाही तर जपान आणि अमेरिकेलाही या भूकंपाचा मोठा फटका बसला आहे.
रशियात 15 फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. तर जपानमध्ये 3 मीटरहून अधिक उंच त्सुनामीच्या लाटा उसळत आहेत. अजूनही जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अणू बॉम्ब स्फोट होऊ शकतो, अशी भीती असल्यानेच जपानच्या फुकूशिमा अणू ऊर्जा केंद्राला तात्काळ खाली करून हे केंद्र बंद करण्यात आलं आहे.
आता या त्सुनामीच्या धडकी भरवणाऱ्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. अनेक भागांमध्ये नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय.
जगातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक रशियाच्या किनाऱ्यावर धडकला आहे. बुधवारी पहाटे हा भूकंप समुद्रामध्ये झाला. ज्यामुळे उत्तर पॅसिफिकमध्ये त्सुनामी आली आणि दक्षिणेकडील अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
तीन देशांवर धोक्याचे संकट आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या भूकंपात नेमके किती नुकसान झाले हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाहीये. मात्र, तीन देशांवर त्सुनामीचे संकट आहे.
त्सुनामीच्या भीतीने जापानमधील अणुऊर्जी प्रकल्प बंद करण्यात आला. जपानच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळचा त्सुनामीच्या मोठ्या लाटा उसळत आहेत.
जापानमध्ये त्सुनामीचे तिनदा सायरन वाजल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालंय. त्सुनामीच्या भीतीने लोकांनी उंच इमारतीवर आश्रय घेतलाय.
जपान हवामान संस्थेच्या माहितीनुसार, 16 ठिकाणी 40 सेंटीमीटर 1.3 फूट उंचीचे त्सुनामी लाटा दिसल्या आहेत. समुद्राच्या लाटा होक्काइडोपासून टोकियोच्या ईशान्येकडे पॅसिफिक किनाऱ्यावर दक्षिणेकडे पुढे जात आहेत.
त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या लगत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलंय. काही हेल्पनंबरही जारी करण्यात आली. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या त्सुनामीकडे आहे.
पुढील काही तास या तिन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जातंय. सर्व यंत्रणा कामाला लागली असून अजूनही नुकसान नेमके किती झाले, याची माहिती पुढे येऊ शकली नाही.








