ट्रम्प यांची पुन्हा भारताला धमकी,भारतावर टॅरिफ लादू शकते
Trump threatens India again, may impose tariffs on India

अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही. भारत हा चांगला मित्र आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पण, इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त शुल्क आकारले आहे.
इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती
डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 च्या टॅरिफ डेडलाइनच्या दोन दिवस आधी हे मोठं विधान केलं आहे. मागच्या काही आठवड्यांपासून ट्रम्प म्हणत आहेत की,
अमेरिका भारतासोबत सात-एक कराराच्या जवळ आहे. असं असलं तरी आता टॅरिफवर पुन्हा एकदा ट्रम्प सरकार लादण्याचा विचार करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा,आंतरवाली सोडली तर….. !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ कर लादण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, भारतावर 20 ते 25 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले जाऊ शकते.
मात्र, दोन्ही देश व्यापार करारावर वाटाघाटी करत असल्याने अंतिम शुल्क अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले.
एमबीबीएस डॉक्टरच निघाला ड्रग तस्कर
हा करार अद्याप अंतिम झालेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. स्कॉटलंडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर एअर फोर्स वनमधून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, भारताने 20 ते 25 टक्के शुल्कासाठी तयार राहावे.
भारताने इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेवर जास्त शुल्क लादल्याचा आरोप करत आता आपण पदभार स्वीकारत असल्याने हे सर्व संपेल, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर रिटायर्ड होणार; मोहन भागवतांच्या विधानाने चर्चांना उधाण
भारतावर 20 ते 25 टक्के शुल्क आकारले जाणार का, असे विचारले असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘होय, मला तसे वाटते.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेतले. भारत माझा मित्र आहे. त्यांनी माझ्या विनंतीवरून पाकिस्तानबरोबरचे युद्ध संपवले. भारतासोबतचा करार अद्याप अंतिम झालेला नाही.’
चक्क मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्राचे वाटप;उपायुक्तावर निलंबनाची कारवाई
‘’भारत हा चांगला मित्र आहे, पण इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त शुल्क आकारले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 च्या टॅरिफ डेडलाइनच्या दोन दिवस आधी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प म्हणत आहेत की, अमेरिका भारतासोबत सात-एक कराराच्या जवळ पोहोचली आहे. सध्या तरी 1 ऑगस्टच्या डेडलाइनपूर्वी कोणत्याही अंतिम व्यापार कराराची घोषणा होण्याची शक्यता नाही.
ट्रम्प यांची भारताला धमकी ;पाहा काय आहे प्रकरण ?
दरम्यान, आता अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे, ते पुन्हा टॅरिफचा वाद निर्माण करणार का? की मित्र-मित्र म्हणून टॅरिफ लादणार, हे येत्या काळातच कळू शकेल.









