राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ५ ऑगस्ट रोजी ॲटमबॉम्ब

Rahul Gandhi to drop an atom bomb on Election Commission on August 5

bj admission
bj admission

 

 

निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे. हा फक्त आरोप नाही तर यासंदर्भात १०० टक्के पुरावे असून आयोगावर अॅटमबॉम्ब पडणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाला तोंड लपवायलाही जागा उरणार नाही,

कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठाचे उल्‍लेखनीय कार्य

 

असा गंभीर इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला विरोधाचा सामना

दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडण केलं असून दररोज असे निराधार आरोप केले जात आहेत. त्याकडे लक्ष देत नसल्याचं म्हटलं आहे.

 

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष फेरपडताळणी मोहीम सुरू केली. परिणाम ६५ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.

 

 

त्यावरून विरोधी पक्षांनी आयोग आणि सरकारवर टीकेची झोड उठवली. आता पाच राज्यामध्ये मतदार यादीची फेरपडताळणी करण्यात येणार आहे.

संसदेत सरकारला थेट सवाल, पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा गृहमंत्रालय आणि CISF काय करत होते?

राहुल गांधी यांनी यावरूनच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान भाजपनेही राहुल गांधींचीही भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय अशल्याचं म्हटलं आहे.

 

 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मी आधीही म्हटलं आहे की मतांची चोरी केली जात आहे. निवडणूक आयोग यात सहभागी असल्याचा आमच्याकडे आता ठोस पुरावा देखील आहे.

अजितदादांकडून माणिकराव कोकाटेंना अभय?

मनाला वाटलं म्हणून मी आरोप करत नाही. माझ्याकडे 100 टक्के पुरावा आहे. ते पुरावे सार्वजनिक केल्यानंतर संपूर्ण देशासमोर निडणूक आयोगाची पोलखोल होणार आहे.

 

 

हे सर्व भाजपसाठी केले जात आहे, हे ही समोर येणार आहे. महाराष्ट्रात राज्यभर मतदानात गैरप्रकार घडला आहे, याची खात्री आहे. मतदार यादीचे पुनरावलोकन झाले आणि एक कोटी नवीन मतदार जोडले गेले.

महायुतीत काहीतरी मोठं घडणार? कार बदलून शिंदे बड्या नेत्याच्या भेटीला

त्यानंतर आम्ही अधिक तपशीलात गेलो. आयोगाने सहकार्य न केल्यामुळे स्वतः चौकशी केली. सहा महिने तपास केल्यानंतर जो पुरावा मिळाला, तो ‘अणुबॉम्ब’ आहे. तो फुटल्यावर आयोगाला लपण्यासाठी कुठेच जागा शिल्लक राहणार नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.

 

 

यामध्ये जे निवडणूक आयोगाचे अधिकारी सहभागी आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार जाणार नाही. हा देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झालात, कुठेही असाल तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ,मालेगाव बॉम्बस्फोट खटला ,निकाल कसा लागणार याची माहिती होती

राहुल गांधी व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनावर विशेष चर्चा घेण्याची मागणी केली आहे.

 

 

मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी SIR मोहीम आखण्यात आली. आयोगाचा हाच उद्देश आहे, असं यातून स्पष्ट होतं.

 

स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ विजबील,जनतेचा उद्रेक

दरम्यान गुरुवारी ५ ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत जाणीवपूर्वक घोटाळा केल्याचा पुरावा सादर केला जाणार आहे. अशा निवडणूक गैरप्रकारांना चालू देणार नाही, असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.

 

अमित शाह-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरून संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले…
निवडणूक आयोगावर दररोज निराधार आरोप केले जात आहेत. अशा आरोपांकडे लक्ष देत नाही. अशा धमक्यांना न घाबरता, सर्व निवडणूक अधिकारी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत आहेत.

 

 

तसंच आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी १२ जून रोजी राहुल गांधींना ईमेलद्वारे आमंत्रण दिले होतं. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. तसंच राहुल गांधी यांनी आयोगाकडे औपचारिकरित्या कधीच कोणतीही तक्रार केली नव्हती, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

 

जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

राहुल गांधी यांचा तो अॅटमबॉम्ब फुसका निघणार आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवडणूक आयोगाविषयी अशी भाषा लोकशाहीविरोधी आणि अशोभनीय असल्याची टीका भाजपने केली आहे.

 

 

 

संबित पात्रा म्हणाले, “राहुल गांधी बॉम्ब फोडणार का? तुम्हाला काय वाटतं? त्यांचं कामच आहे फुटणे. त्यांनी दुसरे काही काम उरलेले नाही. विचार करा ही कोणत्या प्रकारची भाषा आहे.

गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले?

तुम्ही म्हणता, मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, लोकशाही मार्गाने आंदोलन करीन’, पण बॉम्ब फोडणारी भाषा, लोकशाहीला शोभणारी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles