राज ठाकरेंनी कायदा सांगितला;गुजरातमध्ये परप्रांतीयाला शेतजमीन विकत घेता येत नाही
Raj Thackeray explained the law; Migrants cannot buy agricultural land in Gujarat


“देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत, त्या राज्यातील शेतजमीन देशातील कोणताही इतर राज्यातील नागरिक विकत घेऊ शकत नाही. जर ती विकत घ्यायची असेल तर तेथील फेमा कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेची परवानगी घेऊन ती विकत घेता येते.
सभागृहात प्रियांका गांधींचा मोदी-शहां,भाजपवर हल्लाबोल
मग जर प्रत्येकजण आपल्या राज्याच्या विचार करत असतील तर आम्ही का नाही करायचा. आज आमच्याकडे कोण येतय, कोण जमिनी घेतयं काय चाललंय काही माहिती नाही. जवळपास उत्तरेकडील अनेक धनदांडग्यांनी कोकणात जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
आणि आमचेच लोक त्यांना जमिनी विकत आहेत. यातून आपणच संपणार आहोत. हे त्यांना कळतही नाहीये.”अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्य पुन्हा एकदा मराठी गुजराती वादावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठी-हिंदी, मराठी-गुजराती वादाची प्रकरणे घडत आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून रायगडमधील डान्सबारची प्रकरणेही उजेडात येऊ लागली आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रायगडवासियांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत “महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मुलांना हिंदी कसं शिकवता येईल, याचा विचार करत आहे.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला
पण महाराष्ट्रात उद्योग धंद्यांसाठी येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाहीयेत. महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा विचारच नाही. याचं भीषण स्वरूप कुठलं असेल तर रायगड जिल्हा.
रायगडमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. जमिनीचे व्यवहार कऱणारे पण आपेलच कुंपणच शेत खात आहे.” अशी टीका राज ठाकरे यांनी यांनी केली आहे.
“आज रायगडमध्ये अनेक उद्योगधंदे येत आहेत पण त्यासाठीही बाहेरची माणसे येत आहेत. मी ज्या पक्षाच्या व्यासपिठावर आलोय तो शेतकरी कामगार पक्ष, म्हणजे एकीकडे शेतकरी बरबाद होत आहेत.
उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले होते ,’उठेगा नहीं ,शिंदेनी दिले प्रत्युत्तर
आणि दुसरीकडे जे उद्योग येत आहेत तिथे मराठी कामगारांना भरती केलं जात नाही. रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही घेतली पाहिजे.
रायगडचे शेतकरी बरबाद होणार नाहीत, रायगडमधील मराठी तरूण तरूणी या कारखान्यांमध्ये कामाला लागली पाहिजेत यासाठी सर्व पक्षांनी काम करणे गरजेचे आहे.” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी भाजप खासदार दुबेला दिली तंबी ,दुबेला सांगा……
तसेच, “बाकीची राज्ये पाहा, माझ्याकडे जे शिक्षणमंत्री आले होते. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गुजरातचे आहेत. देशाचा गृहमंत्री एका मुलाखतीत ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.
आज महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते, मग आम्ही बोललो तर संकुचित कसे होतो. तुम्ही महाराष्ट्रात हिंदी आणण्याचा प्रयत्न करत आहात. मग गुजरातमध्ये हिंदी आहे का, असा प्रश्न मी शिक्षण मंत्र्यांना विचारला, त्यांनी नाही असे उत्तर दिले.
मग महाराष्ट्रात का आणताय हिंदी. यांच काय राजकारण सुरू आहे हे समजणं गरजेचं आहे. एकदा का तुमची जमिनी गेली आणि भाषा संपली की जगाच्या पाठिवर तुम्हाला कसलंही स्थान नाही.
शिक्षण उपसंचालकावर निलंबनाची कारवाई, SIT चौकशी होणार
गुजरातमधील शेतजमिनी कायद्यानुसार जे गुजरातचे नागरिक नाहीत आणि अनिवासी भारतीयांना गुजरातची जमिन विकत घेता येत नाही. म्हणजेच तुम्ही जर उद्या गुजरातमध्ये शेतजमीन विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला ती विकत घेता येणार नाही. हे भारतात सुरू आहे.
“बाहेरच्या राज्यात आपल्या महाराष्ट्राबद्दल काय बोलले जाते माहितीये का, मलाच सांगायला लाज वाटते. विकत घेता येणारी माणसे,” अशा उद्देशाने आपल्या महाराष्ट्रातील लोकांबद्दल बोलले जाते ही आपली प्रतिमा आहे का, हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र विकला जातोय.
शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
बिकाऊ आहे. इथली माणसं विकली जातात, आपली भाषा, जमिनी सगळं सोडून द्यायला तयार होतो असा आपला महाराष्ट्र आहे का,” असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. रायगडमध्ये आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभेत ते बोलत होते.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी-मराठी, मराठी- गुजराती वादाच्या ठिणग्या पडत आहेत. त्यातच गेल्या महिन्यात राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णय़ावरूनही राजकारण तापलं होतं. त्यावरून राज ठाकरेंवर अनेक गंभीर आरोपही झाले. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
रागयडमध्ये परप्रांतीयांकडून शेतजमिनी विकत घेतल्या जात आहेत. याकडे लक्ष वेधत त्यांनी रायगडवासियांना डोळे आणि कान उघडे ठेवून विचार कऱण्याचा सल्लाही दिला आहे.
कशासाठी महाराजांचे पुतळे ठेवायचे, या गोष्टी शिकवल्या या माणसाने आपल्याला. फारसी शब्द महाराष्ट्रात असू नये यासाठी स्वत:चा शब्दकोश काढणारा हा माणूस ज्याने मराठी भाषेत बोलले पाहिजे हे सांगितलं त्या महाराष्ट्रात आम्ही आमच्या भाषा विसरतोय जमिनी घालवतोय आमचं सत्त्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय,
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
तुम्ही जिवंत प्रेतांसारखी माणसं होऊ नका. हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. तुम्ही जिवंत असलं पाहिजे, तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून मोठे होऊ नका, इतरांच्या आहारी जाऊन जमिनी विकू नका.
तुम्ही महाराष्ट्रावर बोलत असता, तिथे गुजरातमध्ये दोन वेळा बिहाऱ्यांना हाकलून दिलेलं आहे. पहिल्या वेळी २० हजार लोकांना हाकलून दिले.
एका अल्पेश ठाकूर नावाच्या तरूणाने आंदोलन केलं त्यावेळी २० हजार बिहारी हाकलून दिले गेले. त्यानंतर भाजपने त्यालाच आमदारकीसाठी त्यांच्या पक्षातून तिकीट दिले आणि तो निवडणूक जिंकलाही.
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
म्हणजे २० हजार बिहाऱ्यांना हाकलून देणाऱ्या अल्पेश ठाकूरचा सत्कार होत असेल तर राज ठाकरे बोलतो तर तो संकुचित देशद्रोही कसा असू शकतो. आतापण गुजरातमधून बिहाऱ्यांना हाकलून दिलं आहे.
ते त्यांच्या राज्यात कसे राहत आहेत ते बघा आणि हे आमच्या राज्यात गोंधळ घालायला येत आहेत. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. ”
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
या राज्यात कोणत्या प्रकारची प्रगती होते. कुठून रस्ते निघणार आहेत ते फक्त मंत्र्यांनाच माहिती असते. का तेच ठरवणार रस्ता व्हायच्या आधी तेच जमिनी घेणार आणि मग या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि गब्बर होणार.
त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पैसे फेकून मारणार आणि त्या जोरावर तुमच्याकडून मतं घेणार, एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कुणी खोलात जाऊन विचार करायला तयार नाही.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यपदी शशिकांत शिंदे
सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात, ते बंद झाले होते ना, मग रायगडमध्ये एवढे अनधिकृत डान्सबार कुठून आले, ते कुणाचे तर अमराठी लोकांचे. हा रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिव छत्रपतींची राजधानी आहे ना इथे,
कल्याणच्या सुभेदाराची खणा नारळानी ओटी भरून त्याला परत पाठवणारा राजा. त्याची राजधानी इथे असताना त्याच रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटवून टाकायचं. मुळ मुद्द्यांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे, वेगळेच विषय आणायचे.
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, शिवीगाळ
कालच मला कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्र राज्य गुजरात साहित्य संम्मेलन भरवत आहे. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्त बरं होईल. पण हे काय चालू आहे, मराठी आणि गुजराती माणसाची इथे लागलीच पाहिजे,
भांडण व्हावीत. त्यातून आपण मते कशी काढू शकतो, यासाठी हे उद्योग सुरू आहेत. बाकी काही नाही. त्यांना वाटलं होतं. संजय राऊत, राज ठाकरे त्यावर काही रिअॅक्ट करतील, पण आम्ही होणार नाही.
ट्रम्पचा इशारा;अमेरीकेत हजारो भारतातील नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार
आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून मराठी माणसाच्या अंगाला नख लागतंय त्यावेळी अंगावरच येऊ, आज तुमच्यासमोर आलोय कान डोळे बंद ठेवू नका,
लक्ष ठेवा, तरूण तरूणींना माझी विनंती आहे, लक्ष ठेवा, तुमची जमीन विकली जात आहे. उद्या तुमची भाषाही निघून जाईल. कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारून घेण्याची वेळ येईल.








