पहा;VIDEO उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; भयंकर ढगफुटी, गावावर कहर सर्व काही उदध्वस्त,शेकडो मृत्यूची भीती

Major accident in Uttarkashi; Terrible cloudburst, havoc in the village, everything destroyed, fear of hundreds of deaths

bj admission
bj admission

 

नितीन गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे हर्षिल येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर वाहून आलेल्या मलब्यात अनेक जण गाडले गेले आहेत.

 

 

तर काही घरं पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत. ६० जण बेपत्ता असण्याची भीती आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अवघ्या २० सेकंदात सर्व काही नष्ट होतानाचं भयानक दृश्य दिस आहे.

 

अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकीचा बीडच्या तरुणाला मेसेज

प्राथमिक माहितीनुसार, अनेक हॉटेलमध्ये पाणी शिरलं आहे. घरे आणि दुकानांमध्येही वाहून आलेला मलबा शिरला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धाराली बाजारपेठ परिसरातही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. भटवाडी येथील एसडीआरएफ टीम देखील धारलीला रवाना झाली आहे.

 

महापालिका,न.पा ,जिल्हा परिषद निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हर्षिलजवळील धारली येथे ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली.

 

उत्तरकाशी पोलिसांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया एक्स वर शेअर केली. हर्षिल परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने धारलीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच,

 

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील या भागात जोरदार पाऊस

पोलिस, एसडीआरएफ आणि लष्कर यासारख्या आपत्ती पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. नदीपासून योग्य अंतर आणि सुरक्षितस्थळी जाण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे.

 

 

 

Image

Related Articles