उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा PA असल्याचे सांगून 18 जणांना घातला लाखोंचा गंडा

18 people were duped of lakhs by claiming to be Deputy Chief Minister Eknath Shinde's PA

bj admission
bj admission

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वीय सहायक असल्याचे सांगून बोगस दाम्पत्याने १८ जणांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

अजित पवारांच्या आमदाराचा, ६२ कोटींच्या गैरव्यवहाराचा भाजप नेत्यांनेच केला पर्दाफाश

 

बनावट ओळखपत्र, लेटर पॅड, बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून १८ जणांची ५७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पाचोऱ्यातील शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्याने रेल्वे मध्ये नोकरी लावू देऊ, म्हाडामध्ये प्लॅट देऊ यासह इतर अनेक आमिष दाखवून नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनेकांची फसवणूक केली.

 

अजित पवारांच्या आमदाराचा, ६२ कोटींच्या गैरव्यवहाराचा भाजप नेत्यांनेच केला पर्दाफाश

रहिवासी हितेश रमेश संघवी (वय ४९) व पत्नी अर्पिता संघवी (वय ४७, रा. नवी मुंबई) या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तात्काळ आर्थिक शुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

 

 

हितेश रमेश संघवी व अर्पिता संघवी यांनी नोकरी आणि इतर विविध आमिष दाखवून आधी जाळ्यात ओढले. तर दाम्पत्याने 23 नोव्हेंबर 2024 ते 8 ऑगस्ट 2027

 

सुप्रीम कोर्टाने ईडीला भयानक झापले ,अधिकाऱ्यांना फुटला घाम

या कालावधीत हर्षल शालिग्राम बारी (32, रा. विक्ठल पेठ) यांची 13 लाख 38 हजार रुपये व इतर उतरित जणांकड्न एकूण 42 लाख 22 हजार रुपये अशी एकूण 57 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

 

हर्षल बारी यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. कारलिंकामाता मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या डेअरीमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. अनेक दिवस झाले तरी ना नोकरी मिळाली किंवा कोणतेही काम मिळाले.

उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांच्या नियुक्त्यांची अधिसूचना जारी

त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

Related Articles