मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ;नांदेडमध्ये 4-5 जण दगावल्याचा संशय ,IMD च्या २४ तासांच्य इशाऱ्याने वाढली चिंता

Heavy rains in Marathwada; 4-5 people suspected to have died in Nanded, IMD's 24-hour warning increases concerns

bj admission
bj admission

 

 

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली

दिल्लीत मोदी-शाहांनी राष्ट्रपतींची भेट, संजय राऊतांचा मोठा बॉम्ब

मुखेडमधील तीन गावात शंभरहून अधीक लोकं अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.

 

 

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. लेंडी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

 

राहुल गांधींनी महाराष्ट्रात मतदार यादीत 40 लाख मतदारांचा घोळाचा पर्दाफाश करताच भाजपमध्ये खळबळ

रावनगाव येथे सुमारे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांचा शोध घेण्याचे व बचावकार्य सुरू आहे. NDRF पथकाकडून बचाव मोहिमेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

 

दरम्यान, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकले आहे. पाण्याची सतत आवक सुरू असल्याने पुराचा धोका अधिक वाढत आहे.

 

राहुल गांधींनी सांगितले कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात कशी झाली मतांची चोरी

विष्णुपुरी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून, 64 हजार 412 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. येत्या तासाभरात अजून दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. खास करून नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

पाहा ;VIDEO, नितीन गडकरींच्या मतदारसंघातील साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली

एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत .तर लातूरमध्ये स्थानिक पथक बचाव कार्य करत आहे. काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय .जवळपास सव्वाशे जनावर दगावली आहेत.

 

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

 

१५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी तुमच्या जिल्ह्यातील ध्वजारोहण मंत्री करणार ,सरकारकडून यादी जाहीर

पावसाच्या पाण्यात ७० शेळ्या, सात बैल, पाच म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले. त्याचबरोबर हजारो एकर शेती जमीन खरवडून गेली आहे, शेतातील उभं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे.

 

बीडच्या परळी तालुक्यातील कौडगांव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने अंदाज न आल्याने बलेनो कार वाहून गेल्याची घटना घडली आहे.

 

माहिती अधिकारी कार्यकर्त्याला 15 लाखांची लाच घेताना अटक

त्यामध्ये एकूण चार 04 व्यक्ती होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने 1 ते 4 वाजेदरम्यान शोध घेतला असता 03 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. पुणे येथून एनडीआरएफ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

 

 

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना,

 

राहुल गांधीची आजपासून बिहारमध्ये १३०० किमी ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

 

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रात्रौ ११.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि. १९ ऑगस्ट २०२५ ८.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० २० पर्यंत ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

 

राज्यभरात पावसाचा हाहाकार ,मराठवाड्यासह इतर भागाला देण्यात आला ‘हा’ इशारा

या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

राहुल गांधीची आजपासून बिहारमध्ये १३०० किमी ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
भारतीय हवामान खात्याकडून दि. १७ ते दि. २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

 

तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्याचाबत सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

 

सतर्कतेचा इशारा;येलदरी धरण ९५ टक्के भरले

NDRF चे १ पथक बीड तालुका परळी कौडगाव येथे शोध व बचाव कार्यासाठी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने रवाना करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे १ पथक नांदेड तालुका मुखेड हळणी गाव येथे नियुक्त केले असून त्या परिसरात कार्यरत आहे.

 

 

IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परत दिली धमकी

तसेच SACHET platform चा वापर करून हवामानाचे अलर्ट नागरिकांपर्यंत SMS /NOTIFICATION च्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

 

 

 

Related Articles