गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू

A big lobby has started in the state in the name of cow protection.

 

 

 

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे. यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय.

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल;मोदींच्या गरम सिंदूरची थंड कोल्ड्रिंक झाली

 

सरकारने याबाबत लक्ष घालून कारवाई करावी. यावर कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू. असा थेट इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

 

 

गाई म्हशीमध्ये राहून आमची माय-बहिण, बाप शेण, दूध काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमधून धंदा करत आहेत.

 

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

सरकारला माझी विनंती आहे, की बाबा शेतकऱ्यांचा व्यवसाय आशाने मरून जाईल. गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

 

दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा दहा म्हशी जबरदस्तीने फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्याचं सांगितलं होतं. शेतकऱ्यांना न्यायालयात जाऊन मग या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते.

 

भाजपला धक्का ;या पक्षाने घेतला विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय

तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यावर म्हशी गोशाळेत नसल्याचे लक्षात आलं. विचारपूस केल्यावर या गोरक्षकांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन म्हशींना चरायला डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उडवाउडवीची उत्तरं दिलीत.

 

 

या प्रकरणात शेतकऱ्यांची ना दाद, ना फिर्याद, अशी परिस्थिती झालीय. त्यामुळे या गोरक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केलीय.

 

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा,मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई

थार सारख्या कॉर्पोरेट गाड्यामधून काही लोक पुण्या-मुंबईवरून येतात आणि आमच्या गोरक्षणाचे काम करत असल्याचे सांगतात. गोरे गुंठे असतात तुम्हाला कळत नाही, शहरात कुत्रे-मांजर बघितले यांच्याकडे गाई गोटे कुठून आले. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू.

 

 

मात्र जे शेतकरी नेते माझ्यावर टीका करत आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलून यावर त्वरित उपाय करावा. आम्ही आता गोशाळेत जाणार आहोत. काल पोलिसांच्या समोर पंचनामा केला.

पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत दिल्ली उच्च न्यायायलाने दिले आदेश

तिथे एकही जनावर नव्हतं. तेच पोलीस पुन्हा म्हणतात सात जनावर होते, आज परत पोलिसांना सांगितले आमचे 21 जनावर आहेत. त्यामुळे कोणीतरी त्यांना पाठीशी घातले हे दिसतंय. असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

 

 

 

Related Articles