डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

Dr. Sheikh Mohammad Wakiuddin Sheikh Hamiduddin announced with National Teacher Award

 

 

 

केंद्र सरकारने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. देशभरात पंचेचाळीस शिक्षकांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून तीन शिक्षकांना हा सन्मान मिळाला आहे.

 

जरांगेंचे टार्गेट फडणवीस, शिंदे मात्र गप्प

यात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन,

 

 

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देशातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार मानला जातो. हे पुरस्कार पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

 

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता
डॉ. शेख मोहम्मद यांनी अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणातील गळती रोखण्यासाठी ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी’ या उपक्रमाची स्थापना केली आहे, ज्याला राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे.

 

त्यांनी डिजिटल शाळा आणि आधुनिक ग्रंथालय यांसह विविध शैक्षणिक उपक्रम करून शाळेची शिकणाऱ्यांची संख्या हजारांपर्यंत पोहोचवली आहे. ते म्हणतात की हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा परिणाम असून, तो विद्यार्थी आणि ग्रामीण समुदायाचा देखील आहे.

ट्रम्प च्या ‘टॅरिफ’ मुळे भारताला ४८ अब्ज डॉलरचा फटका

सव्वीस वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करणार्‍या डॉ. शेख यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव आहे.

 

त्यांचा मानस नेहमी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहकार्य यांचा महत्व पटवण्यासाठी पुढे काम करत राहण्याचा आहे.

मला गोळ्या घाला….; मोर्चापूर्वी जरांगेंचासरकारविरुद्ध एल्गार

अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, हे यशवंत कॉलेज ऑफ आयटी परभणीचे अध्यक्ष डॉ . रफिक शेख यांचे मेहुणे आहेत.

 

डॉ. शेख मोहम्मद हे UPSC,MPSC च्या मुलाखतीपर्यंत पोहोचले, तसेच त्यांनी phd करून सुद्धा विद्यापीठ ,महाविद्यालयात नोकरी न करता भारताचे भविष्य असलेल्या शाळेतील मुलांचे भविष्य उज्वल करण्याला प्राधान्य दिले .

IT क्षेत्रात खळबळ उडाल्यानंतर अमेरिकेतील 1500000 भारतीय नोकरी गमावणार

त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही उतकृष्ठ शिक्षण देऊन भारताचे उज्वल भविष्य घडविता येते हे सिद्ध करून दाखविल्याची प्रतिक्रिया डॉ. रफिक शेख यांनी डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन याना मिळालेल्या पुरस्कराबद्दल व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

Related Articles